नगरसेवक असावा तर नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या सारखा
प्रभाग क्रमांक 26 मधील द्वारका नगर येथे काल झालेल्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात पावसाचे पाणी थांबल्यामुळे या परिसरातील विविध नगरात तळ्याचे स्वरूप झाले होते.अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे बेहाल झाले होते. रात्रीचे साडेबारा ते एक वाजेपर्यंत सदर नगरात महापालिकेचे कर्मचारी कार्यरत असताना माजी नगरसेविका राजश्री चव्हाण या ठिकाणी समक्ष उभे राहून पाण्याचा निचरा होईपर्यंत थांबून होत्या.

प्रभाग क्रमांक 26 मधील द्वारका नगर येथे काल झालेल्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात पावसाचे पाणी थांबल्यामुळे या परिसरातील विविध नगरात तळ्याचे स्वरूप झाले होते.अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे बेहाल झाले होते.
ड्रेनेजचे मैला मिश्रित पाणी घरात गेल्याने दुर्गंधी सुटून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत होते. याबाबतीत प्रभागाच्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना ही बाब त्या नगरातील नागरिक सोमनाथ निंबाळे,अक्षय पारधे, श्री धनवे, सुनील नेटके यांनी या समस्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांना सांगितल्यानंतर, प्रभागाच्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या मार्फत अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी नगरामध्ये जेसीपी, जेटीग मशीन, पाणी उपसा करण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार उपलब्ध करून देण्यात आले. युद्ध पातळीवर बाधित नगरात रात्रीचे 12 ते 12.30 वाजेपर्यंत कामकाज चालले. महापालिकेचे कर्मचारी कार्यरत असताना माजी नगरसेविका राजश्री चव्हाण या ठिकाणी समक्ष उभे राहून पाण्याचा निचरा होईपर्यंत थांबून होत्या.
याप्रसंगी सदर नगरातील नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले की गेल्या दोन-तीन दिवसापासून प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी व भावी नगरसेवक म्हणून संबोधले जाणारे अनेकांनी फोटोसेशन करून निघून गेले. परंतु माजी नगरसेविका राजश्री चव्हाण ह्या सतत तीन दिवसापासून सदर नगरातील समस्या दूर करण्यासाठी अथक प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. रात्रीचे साडेबारा ते एक वाजेपर्यंत सदर नगरात समक्ष उभे राहून नागरिकांच्या समस्या सोडविले आहे. आत्तापर्यंत आम्ही असे कर्तव्यदक्ष, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी धावून येणारे नगरसेवक कधीच पाहिले नाही नगरसेवक असावा तर नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांच्या सारखा असावा असे सदर नगरातील नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे केले व कामाबद्दल आभार व्यक्त केले.
What's Your Reaction?






