वीरशैव लिंगायत हिंदूच! उद्या हुबळीत पुनरूच्चार!!

पाच जगद्गुरू, 1200 शिवाचार्यांचे वीरशैव लिंगायत एकता संमेलन कर्नाटक, आंध्र, तेलंगाणा, महाराष्ट्र या राज्यांमधून येणार लिंगायत बांधव; काशी जगद्गुरूंच्या उपस्थितीत सोलापुरात शिवाचार्यांची नियोजन बैठक

Sep 16, 2025 - 23:55
 0  738
वीरशैव लिंगायत हिंदूच! उद्या हुबळीत पुनरूच्चार!!

(विजयकुमार पिसे)
   देशात पुढील वर्षी जातनिहाय जनगणना होणार असून काही मंडळी वीरशैव लिंगायत बांधवांत संभ्रम पसरवित आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर उद्या शुक्रवारी 19 सप्टेंबर (2025) रोजी हुबळीत वीरशैव लिंगायत एकता संमेलनाचे आयोजन केले आहे. पंच जगद्गुरू, 1200 शिवाचार्य आणि वीरक्त मठांचे प्रमुख  आणि अन्य मठाधिपती यांच्या उपस्थितीत वीरशैव लिंगायत हिंदूच! याचा पुनरूच्चार आणि त्यावर शिक्कामोर्तबही होईल. यासंदर्भात काल अक्कलकोट रोडवरील बृह्न्मठ होटगी येथे काशी जगद्गुरू डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीमध्ये पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण भागातील शिवाचार्यांची नियोजन बैठक़ पार पडली. तसेच यावेळी सोलापूरची कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली.
    कर्नाटक,आंध्र,तेलंगाणा आणि महाराष्ट्रातून वीरशैव लिंगायत बांधवांनी मोठ्या संख्येने वीरशैव लिंगायत एकता संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन काशी जगद्गुरू डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी केले आहे. अ.भा. वीरशैव महासभा बंगळुरू, अ.भा.शिवाचार्य संस्था बंगळुरू,  श्रीमद वीरशैव शिवयोग मंदिर या शिखर संस्थांनी या अधिवेशनाचे आयोजन केले आहे. जातनिहाय जनगणनेत  लिंगायत बांधवांनी कोणती भूमिका पार पाडावी, याविषयी हुबळी संमेलनात निर्णय होईल, याकडे अ.भा. शिवाचार्य संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी (नागणसूर/रेवूर मठ) यांनी लक्ष वेधले.
   हिंंदू धर्म हा वटवृक्ष उाहे, लिंगायत समाज त्याची प्रमुख शाखा आहे, असे काशी जगद्गुरू डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी केले आहे. तसेच गेल्या महिन्यात श्रीशैल, रंभापुरी, केदार आणि उज्जैन पीठाच्या जगद्गुरूंनीही  पुनरूच्चार केला. आता पंचजगद्गुरू या संमेलनानिमित्त पुन्हा एकदा व्यासपीठावर  येत आहेत. त्यामुळे हुबळीत होणार्‍या वीरशैव लिंगायत एकता संमेलनाचे महत्व अधोरेखित झाले आहे.
    होटगी मठातील बैठक़ीस श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली बीड,जालना,परभणीचे विभागीय सचिव गुरू वीरपाक्ष शिवाचार्य माणूरकर महाराज यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अध्यक्ष : डॉ.पंचाक्षरी शिवाचार्य महाराज बृह्न्मठ माळकवठे, उपाध्यक्ष : राचलिंग शिवाचार्य महाराज परंडकर बृहन्मठ बार्शी, आणि सचिव :  प्रभुदेव शिवाचार्य माढेकर महाराज मठ संस्थान माढा. यांची नियुक्ती जाहीर केली.
    बसवलिंग स्वामीजी वीरक्त मठ अक्कलकोट, शिवानंद स्वामीजी वीरक्त मठ करजगी, शांतवीर शिवाचार्य  महाराज मादनहिप्परगी/चलगिरी, उपमन्यू शिवाचार्य महाराज ऐनापूर कलबुर्गी, नीलकंठ शिवाचार्य महाराज मैंदगी, राचोटेश्‍वर शिवाचार्य महाराज सिध्दनकेरी,वीरंतेश्‍वर स्वामीजी केसरजवळगा, वीरसोमेेश्‍वर स्वामीजी सरसंबा,वीरशिवलिंग शिवाचार्य महाराज कडबगाव,महदय्या रवीशंकर शिवाचार्य महाराज,रायपाटण (कोकण प्रांत) आदी शिवाचार्य व स्वामीजी तसेच बृहन्मठ होटगी मठाचे विश्वस्त शिवानंद पाटील, विहिंप सहमंत्री विजयकुमार पिसे, हिंदू जनजागरण मंच संयोजक मल्लिकार्जुन पाटील, राजेंद्र गंगदे तसेच अनेक भक्त मंडळी या बैठकीस उपस्थित होते, अशी माहिती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow