सतत 50 वर्षे निवडून आले पाहिजे : परिकीपंडला
प.महाराष्ट्र पद्मशाली संघातर्फे नगरसेवकांचा सत्कार,डॉ.सूर्यप्रकाश कोठे यांचे वतीने आयोजन
देशभरातील पद्मशाली समाज शिक्षण, उद्योग क्षेत्रात चांगले काम करत आहे. समाजाने राजकीय क्षेत्रात पुढे जाण्याची गरज आहे. काम असे करा, की 50 वर्षे सातत्याने निवडून आले पाहिजे, असे आवाहन मध्य प्रदेश सरकारचे प्रधान सचिव नरहरी परिकीपंडला यांनी केले. पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉ.सूर्यप्रकाश कोठे यांच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रातून नव्याने निवडून आलेल्या पद्मशाली समाजातील नगरसेवक, लोकप्रतिनिधींचा सत्कार सोलापुरातील महालक्ष्मी बॅन्क्वेट हॉलमध्ये झाला.
महापौर विनायक कोंड्याल, पद्मशाली संघाचे गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकुरवार, अध्यक्ष स्वामी कंदगटला, उपाध्यक्ष रामकृष्ण कोंड्याल, सरचिटणीस प्रदीप संगा, समन्वयक तुकेश भैरी, पद्मशाली संघाचे अध्यक्ष भूपती कमटम,प्रधान सचिव वासुदेव इप्पलपल्ली आदी होते. प्रारंभी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी प्रास्ताविक केले.
सामाजिक,आर्थिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेैत्रात सक्षम होण्याची आवश्यकता व्यक्त करताना परिकीपंडला यांनी,राजकीय क्षेत्रात एकदा नव्हे तर सातत्याने 50 वर्षे निवडून आले पाहिजे,असे आवाहन केले.
याप्रसंगी महापौर कोंड्याल, नगरसेवक प्रथमेश कोठे, स्वाती बडगू, मेघनाथ येमूल, उज्वला दासरी, दीपिका यलदंडी, सतीश सिरसिल्ला, अजय पोन्नम, सिद्धेश्वर कमटम, अर्चना वडनाल, सत्यनारायण गुर्रम, विजय चिप्पा, श्रीकांचना यन्नम, प्रशांत पल्ली, कविता गज्जम, व्यंकटेश कोंडी, ज्ञानेश्वर म्याकल, अहमदनगरचे नगरसेवक दत्तात्रय रासकोंडा, श्रीपाद छिंदम, संगमनेरच्या नगरसेविका सरोजिनी पगड्यालयांचासत्कार करण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे कार्याध्यक्ष व्यंकटेश चाटला, प्रधान सचिव वासुदेव इप्पलपल्ली, यल्लप्पा गड्डम, सरचिटणीस दयानंद मामड्याल, श्रीनिवास चिलका, हरिदास पोटाबत्ती, मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, कैलास गोरंट्याल (जालना), पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, पूर्व विभाग वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, मार्कंडेय रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुर्रम, उपाध्यक्ष रमेश विडप, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री, धनश्री कोंड्याल आदी मान्यवर उपस्थित होते.
What's Your Reaction?