विकासाचा घेतला वसा, आ. देवेंद्र कोठेंचा ठसा!

विधानसभा अधिवेशनात सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न,अभियांत्रिकी महाविद्यालय, टेक्स्टाईल पार्क, गोरक्षण अन् गणेशमूर्तीकरांच्या समस्यांकडे वेधले लक्ष

Mar 7, 2025 - 11:58
 0  398
विकासाचा घेतला वसा, आ. देवेंद्र कोठेंचा ठसा!

 सोलापूर : विकासात्मक लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा मापदंड आ.देवेंद्र कोठे यांनी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, टेक्स्टाईल पार्क, गोरक्षकांवरील खोटे गुन्हे, गणेश मूर्तीकारांच्या समस्या याकडे आ. कोठे यांनी लक्ष वेधले. विशेष म्हणजे रात्री उशिरा 11 वाजता त्यांना सभागृहात संधी मिळाली. त्याचे सोने केले. 
   1960 पासून सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. सोलापुरात अनुकूल परिस्थिती असूनही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडला हलवण्यात याकडे लक्ष वेधून आ.कोठे म्हणाले,  सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी 300 कोटींची घोषणा केली असून  सध्याच्या शासकीय तंत्रनिकेतनाची 34 एकर जागा आहे. तज्ञ प्राध्यापक वर्गही आहे. त्यामुळे येत्या जूनपासून येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होऊ शकते. एक लाखाहून अधिक यंत्रमागधारक व कामगार व वस्त्रोद्योगासाठी अनुकूल वातावरण पाहता टेक्स्टाईल पार्क गरजेचे आहे. चादर, टॉवेल, युनिफॉर्म गारमेंट यांचा एकत्रित समावेश करून टेक्स्टाईल पार्कमुळे उद्योगांना मोठा वाव मिळेल, असे कोठे म्हणाले. 
    सोलापुरात गणेशमूर्तीचे 18 हजार मूर्तीकार आहेत. पीओपीवरील बंदीमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बिकट असून पीओपी प्रकरणावर अंतिम निकाल लागेपर्यंत मूर्तिकारांवर कारवाई नको.  सोलापूर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या सीमेवर असल्याने या जिल्ह्यात गोहत्या व गोतस्करीचे प्रमाण मोठे आहे. गोरक्षकांवर हल्ले, खोटे गुन्हे असे प्रकार आहेत. त्यामुळे शासनाने गोरक्षाअनुकूल कायदे करावेत. हल्लेखोरांवर तातडीने गुन्हे दाखल करा, अशी मागणीदेखील आ. देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात केली. शहरासाठी अमृत 2 योजना, 100 इलेक्ट्रिक बस आदी योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याकडेही  आ.कोठे यांनी लक्ष्य वेधले.
समाजमाध्यमांवर कौतुक
आ.देवेंद्र कोठे यांनी अधिवेशन काळात दिवसभर सभागृहात कामकाजास उपस्थित राहून रात्री तब्बल 11 वाजेपर्यंत थांबून चर्चेची संधी मिळताच सोलापूरकरांच्या जिव्हाळ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधले. आ. कोठे विकासात्मक दृष्टिकोनातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. याबद्दल सोलापूरकरांनी समाजमाध्यमांवर आ.कोठे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow