रोजगारभिमुख व्यवस्था कायमस्वरूपी निर्माण करण्याचा नगरसेविका वरलक्ष्मी पुरुड यांचा संकल्प

रोजगारभिमुख, आरोग्य आणि मूलभूत सुविधांंची पूर्ती सौ.वरलक्ष्मी श्रीनिवास पुरूड (प्र.19 नीलम श्रमजीवी नगर, आकाशवाणी परिसर) रस्ते, ड्रेनेज आणि एसटीपी योजना पूर्णत्वास

Mar 8, 2025 - 12:48
Mar 8, 2025 - 12:49
 0  457
रोजगारभिमुख व्यवस्था कायमस्वरूपी निर्माण करण्याचा नगरसेविका वरलक्ष्मी पुरुड यांचा संकल्प

    प्रभाग 19 नीलम श्रमजीवीनगर, आकाशवाणी परिसर. 1992 च्या हद्दवाढमध्ये मनपा हद्दीत आला. पण विकासापासून वंचित. श्रमजीवीनगर असाच उल्लेख असलेला प्रभाग 2002 मध्ये भाजपाचे नगरसेवकांना नागरिकांनी जेव्हा संधी दिली. पुढे 2017 मध्ये सौ.वरलक्ष्मी श्रीनिवास पुरूड यांना संधी मिळाली. त्या दिवसांपासून  रस्ते, ड्रेनेेज, पाणी पुरवठा, दिवाबत्ती आणि आरोग्य या मूलभूत सुविधांना प्राधान्य. आणि आज यांची पूर्तता केल्याचे समाधान. त्यामुळे येथे एसटीपी प्लॅन्टची उभारणी पूर्ण होत आली आहे. आता रोजगारभिमुख व्यवस्था कायमस्वरूपी निर्माण करण्याचा नगरसेविका सौ. वरलक्ष्मी श्रीनिवास पुरुड यांचा संकल्प.


    शासनाच्या अमृत योजनेत तब्बल 184 कोटींचे ड्रेनेज आणि चेंबर तसेच शेजारच्या देसाई नगरात एसटीपी प्लॅन्टची उभारणी. प्रभागातील 140 छोट्या, मोठ्या नागरी वसाहतीमधील 25 हजार लोकसंख्येला याचा लाभ होणार आहे. आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील दलदलीचा परिसर बदलून टाकला. 10 कोटी निधीची उपलब्धता झाली. तिथे आता पक्के रस्ते, डांबरीकरण, सिमेंट रस्ते आणि ड्रेनेज सुविधांची पूर्तता. भविष्यातील दूरगामी विचार करून पिण्याच्या पाण्यासाठी जलवाहिनी. सिमेंट पेव्हर ब्लॉकच्या माध्यमातून सिध्देश्‍वर नगरला (स्मार्ट नगर) अशी ओळख.   तसेच  नगरोत्थान योजनेचा प्रभाग 19 ला पुरेपूर लाभ. सहकारी नगरसेवक श्रीनिवास करली यांच्या सहकार्याने नगरसेवकपदाचा कार्यकाल संपल्यानंतर देखील 1.33 आणि 1.67 कोटींचे  डांबरी रस्ते आणि सिमेंट रस्ते पूर्ण. शांती नगर आणि ताई चौक ते नीलमनगर हा प्रभागातील सर्वात मोठा रस्ता आणि मोठी रहदारी. पण दलदल आणि अनेक खड्डे. नगरोत्थानच्या 1.67 कोटी निधीमधून मॉडेल रस्ता केला. शिवाय अंतर्गत पाच रस्तेही झाले. 36 लाखातून सिमेंट रस्ते व डांबरीकरण. प्रभागात 25 कोटींचे ड्रेनेज चेंबर बांधले. सिमेंट रस्ते झाले. या कामांसाठी सर्वाधिक निधी मिळवला. खासदारांचाही 50 लाख रुपयांचा निधी मिळाला.   रस्त्याशिवाय प्रभाग असे चित्र आता राहिले नाही. ही कामे वेळेत पूर्ण व्हावेत म्हणून जातीने हजर राहून कामाची गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न नगरसेविका पुरूड यांनी केला.
हद्दवाढ आणि पाणी टंचाई हे समीकरणच. प्रभागात 15 बोअर मारले. 80 जुने बोअर दुरुस्त करून घेतले. तसेच सर्वत्र जलवाहिनी टाकली. पिण्याच्या पाण्याची सोय केली. 2 कोटी निधीमधून टँकरमुक्त प्रभाग अशी आजची स्थिती आहे. सामूहिक वृक्षारोपणातून 1000 ठिकाणी ही योजना पूर्णत्वास नेली. वृक्षारोपणानंतर त्याच्या संंवर्धनासाठी 200 ट्री गार्ड बसविले.


   कोरोना काळात नागरिकांचे आरोग्याची काळजी वाहिली. दर बुधवारी सलग 25 आठवडे लोकमंगल हॉस्पीटलच्या माध्यमातून आरोग्य शिबीर घेतले. आयुष्यमान योजनेतून क्यामा बिल्डींग जवळ आरोग्य केंद्राची कायमस्वरूपी व्यवस्था केली. त्या ठिकाणी केवळ दहा रुपयात तपासणी आणि औषधे उपलब्ध केली आहेत. कोरोना काळात लसीकरण मोठ्या प्रमाणात केले. नागरिकांचे जीव वाचविले. आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड शिबीर. महापालिकेत 2018/19 मध्ये आरोग्य आणि वैद्यकीय समिती सभापती म्हणून काम करण्याची संधी पक्षाने दिली. त्या अनुभवाचा फायदा कोरोना काळात प्रभागासाठी झाला. यूपीएस सेंटर झाले. नवदुर्गा मंदिर येथे 275 जणांचे नेत्रशिबीर आणि शस्त्रक्रिया आणि चष्मे दिले.  महिला बाल कल्याण समिती सदस्य म्हणून संधी मिळाली. या माध्यमातून 10 लाभार्थी महिलांना शिलाई मशीन, पाच गरजू वधूवरांसाठी मंगळसूत्रची सोय केली. 8 मार्च महिला दिनानिमित्त प्रभागातील गुणवंत विडी व शिलाई महिला कामगार आणि विद्यार्थिनी यांचा सन्मान केला.


    शैक्षणिक गुणवत्ता अंतर्गत 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव. अटलजींच्या जयंतीनिमित्त 21 भाजपा कार्यकर्त्यांचाही सन्मान, याशिवाय नेतेमंडळी व कार्यकर्त्यांचे वाढदिवस प्रसंगी त्यांच्या घरी जाउन यथोचित सन्मान केला.  
    पक्षवाढीसाठी सदस्यता अभियानात 1000 नवीन कार्यकर्ते पक्षात जोडले. तसेच सुभाषबापूंच्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अधिक मताधिक्य देण्याची परंपरा नीलमनगर आकाशवाणी परिसरात कायम ठेवली. लोकसभा निवडणुकीतही असेच चित्र राहिले. या प्रचार यंत्रणेतील दोन अनुभव. सुभाषबापूंसमवेत गारमेंट क्षेत्रात कार्यरत 1000 स्त्री पुरुष कामगार आणि 4000 विडी कामगारांची प्रत्यक्ष कारखान्यात भेट घेतली. हा प्रचार लाभदायी ठरला. मोदींच्या प्रचार रॅलीसाठी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


    नगरसेविका सौ. वरलक्ष्मी व श्रीनिवास पुरूड पती पत्नी यांनी धार्मिक जागरणसाठी नेहमीच पुढाकार घेतला.  रा.स्व.संघ व विहिंपच्या माध्यमातून नीलमनगरात धर्मजागृती सभा घेतली. तोगटवीर समाजाच्या श्रावणमासात मिरवणूक मार्गावर चोख व्यवस्था केल्यामुळे भाविकांना दिलासा मिळाला. धार्मिक, समाजिक क्षेत्रातील कामाचे नेहमीच समाधान. म्हणून यासाठी सातत्य कायम ठेवले. 
प्रभाग क्रमांक 19 क : नीलम श्रमजीवीनगर, आकाशवाणी परिसर.
नगरसेविका सौ. वरलक्ष्मी श्रीनिवास पुरुड यांच्या प्रभागातील ठळक विकास कामे
 42 लाख भांडवली,वार्डनिहाय निधी पिण्याची पाईपलाईन, बोरिंग हातपंप, मुरूम
7 लाख वार्डनिहाय निधी प्रभागामध्ये मुरूमीकरण
42 लाख भांडवली, वार्डवाईज निधी नवीन रस्ते
42 लाख भांडवली, वॉर्डवाईज निधी सिमेंट व डांबरी रस्ते
आ.प्रशांत परिचारक यांच्या आमदार निधीमधून भाग्यश्रीनगरात सिमेंट रस्ता
प्र.19 मध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 200 इलेक्ट्रिक पोल व एलईडी 
पेव्हर ब्लॉक, पाच लाखाचे लोखंडी बाकडे, पाण्याचे आरो मशीन प्लॅन्ट
अमृत महोत्सव नगरोत्थान 20 लाखांचे 4 डांबरी रस्ते
अमृत महोत्सव नगरोत्थान 16 डांबरी रस्ते उभारणी
महिला  व  बालकल्याण  समितीवतीने 275 नागरिकांना चष्मे वाटप तसेच 10
नागरिकांना शिलाई मशीन 
नीलमनगर नवदुर्गा  मंदिर, शिवशरण मठ येथे पाण्याचे आरो मशीन प्लॅन्ट 2 लाख
जमादार वस्तीमध्ये जिम साहित्य 1 लाख रुपये
हिंदू सार्वजनिक स्मशानभूमीसाठी 2 लाख रुपये सिमेंट काँक्रीट रस्ता
पाण्याचे आरो मशीन प्लॅन्ट 50 हजार रुपये.


कोरोना काळात दर बुधवारी लोकमंगल हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य शिबीर. 
अशाप्रकारे 25 आठवडे दर बुधवारी शिबीर, तसेच एनर्जी ज्यूस 5000    
नागरिकांना लाभ. शिवाय 3000 जणांना मास्क वाटप
आ.सुभाष बापू देशमुख यांच्याकडून गरजू नागरिकांना फूड पाकीट
आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड शिबीर.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 800 लाडकी बहिणींना लाभ 
आरोग्य आणि वैद्यकीय समिती सभापती ही जबाबदारी होती. तेव्हा  पाच गरजूंना    
मंगळसूत्र देण्यात आले.
भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी श्रीनिवास हणमंतु पुरुड, 1997 पासून भाजपा पक्ष व संघटनेत प्रभाग अध्यक्ष, मंडल उपाध्यक्ष व सरचिटणीस अशा विविध जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडल्या. नवीन मतदार नोंदणी शिबीर. नवीन 1000 सदस्य नोंदणी. नगरसेविका सौ. वरलक्ष्मी या मूळच्या आंध्रप्रदेशातील तेलुगू भाषिक आणि शिक्षणही तेलुगूत 9 वी पर्यंत झाले. तेलुगू आणि मराठी या मायभगिनी. प्रभागातील बहुतांश विडी कामगार व रहिवासी तेलुगू भाषिक. ती जवळीकता आंध्रनंतर महाराष्ट्रातही कायम राहिली. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow