भाजपा राज्य परिषद सदस्यपदी विक्रम देशमुख; शहर अध्यक्षपदानंतर महत्वाची जबाबदारी
ग्रामीणमधून हणमंत कुलकर्णी, शिवशरण जोजन, संजय खिलारे, शकुंतला नडगिरे, राजेंद्र सुरवसे यांनाही संधी, यापूर्वी शामलाल तिवाडी,रामचंद्र जन्नू, विश्वनाथ बेंद्रे होते राज्य परिषद सदस्य

(विजयकुमार पिसे)
संघटनात्मक पातळीवर योग्य व्यक्तीची योग्य ठिकाणी निवड हे भाजपाचे वैशिष्टय. कधी कधी उपेक्षित कार्यकर्त्याला पक्षात मोठी संधी मिळते. ती वेळ कधी येईल हे सांगता येत नाही. सोलापुरात संघटनात्मक कामात आपला छाप उमटविलेले विक्रम देशमुख यांची राज्य परिषद सदस्य म्हणून मिळालेली संधी म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांना सकारात्मक कामाची दृष्टी मिळाली आहे.
सोलापूऱ ग्रामीणमधून हणमंत कुलकर्णी (दक्षिण सोलापूर), शिवशरण जोजन (अक्कलकोट), संजय खिलारे (मोहोळ), शकुंतला नडगिरे (पंढरपूर), राजेंद्र सुरवसे (मंगळवेढा) यांनाही संधी मिळाली आहे.
2017 ची महापालिका, 2014 आणि 2019 ची लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सोलापुरातून पक्षाला निर्णायक यश मिळवून देण्यात महत्वाची कामगिरी पार पाडलेले तत्कालिन अध्यक्ष विक्रम देशमुख यांची राज्य परिषद सदस्य म्हणून निवड झाली. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदाची धुरा स्वीकारताच राज्यभरातून 454 राज्य परिषद सदस्यांची घोषणा केली. यामध्ये केंद्रीयमंत्री गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार 2014 नंतर गत 10 वर्षात प्रदेश स्तरावर राज्य परिषद सदस्यांची नियुक्ती तत्कालिन प्रदेश अध्यक्षांनी केली नाही, अशीही धक्कादायक माहिती आहे.
संघटनात्मक कामात जुने आणि अनुभवी कार्यकर्त्यांची तितकीच निकड असते. ती नसेल तर संघटनेतील नियुक्त पदाधिक़ारी व सत्तेमधील नेतेमंडळी सैरभैर होतात. भाजपाची आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वदूर सत्ता आहे. त्यामुळे हे सैरभैर चित्र जाणवते.
फडणवीस यांच्या युवा मोर्चा टीममध्ये प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांच्यासोबत एकत्र संघटनेत काम केलेला अनुभव ही जमेची बाजू. याशिवाय बूथ यंत्रणेच्या माध्यमातून राजस्थानात वसुंधरा राजे यांचा संवेदनशील झालावाड मतदारसंघ, 2019 मध्ये राहुल गांधी पराभूत झालेल्या अमेठीत स्मृती इराणींचा मतदारसंघ याशिवाय मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यात यश मिळाले. शिवाय पंढरपूर/मंगळवेढा पोटनिवडणुकीतून पहिल्यांदा (समाधान आवताडे) भाजपाचे झेंडा फडकला. तसेच कोल्हापूर येथील पोटनिवडणुकीत विक्रम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरची टीम सक्रिय होती.
सोलापूर शहर अध्यक्ष या नात्याने शहर मध्यचे पालकत्व सांभाळले. सोलापूर भाजपाचे संघटन व पक्ष सरचिटणीस, शहराध्यक्ष, लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे यंत्रणांचे प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडताना 2014 पासून भाजपाला निर्विवाद यश मिळवून दिले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पक्ष संघटना आणि सत्ता यामध्ये समन्वय राखण्याचे हातोटी, ज्यामुळे गटतट असले तरी निवडणुकांमध्ये पक्षाला फटका बसला नाही, तर अपेक्षित असे यशही मिळाले. आज सर्वंकुश सत्ता म्हणून भाजपाकडे पाहिले जाते, इनकमिंगची वेटींग लिस्ट वाढत आहे. यात समतोल साधण्याची निपुणता या नव्या जबाबदारीने पार पाडण्यात विक्रम देशमुख यशस्वी होतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता संघटना व सत्ता यात समरस आणि समन्वयातून अंतिम ध्येयप्राप्ती हेच यशाचे गमक मानता येईल. इतकेच.
सोलापूऱ ग्रामीणमधून हणमंत कुलकर्णी (दक्षिण सोलापूर), शिवशरण जोजन (अक्कलकोट), संजय खिलारे (मोहोळ), शकुंतला नडगिरे (पंढरपूर), राजेंद्र सुरवसे (मंगळवेढा) यांनाही संधी मिळाली आहे. विक्रम देशमुख यांच्यासह सर्व नियुक्त राज्य परिषद सदस्यांचे लक्ष्यवेध न्यूजतर्फे अभिनंदन आणि शुभेच्छा!
What's Your Reaction?






