इन्स्टाग्रामवर महापुरुषांची बदनामी; मैंदर्गीत मोर्चा, रास्ता रोको व बंद! जिहादी विचारांच्या मंडळींचे संतापजनक कृत्य
इन्स्टाग्रामवर महापुरुषांची बदनामी; मैंदर्गीत मोर्चा, रास्ता रोको व बंद! जिहादी विचारांच्या मंडळींचे संतापजनक कृत्य

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान हिंदुस्थान सहन करणार नाही, अशी रोखठोक भूमिका घेत अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला, मैंदर्गी बंद यशस्वी केला. कारण होते, इन्स्टाग्रामवर महापुरुषांची बदनामी आणि स्टेटस, जिहादी मंडळींच्या या संतापजनक कृत्याची दखल घेणे प्रशासनाला क्रमप्राप्त होते. त्यामुळे पोलिसांनीही कारवाई केली.
अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे 7 ते 8 जिहादी विचाराच्या मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बदनामीकारक पोस्ट इन्स्टाग्रामवर केली होती. त्यामुळेच सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मैंदगीत मोर्चा काढला. रास्ता रोको केला तसेच गाव बंद पाळण्यात आला. या संतापजनक घटनेची दखल प्रशासनाने घेतली. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले. व त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला. आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी अनिल पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार अमन अकील हवालदार, व रुमन शकील हवालदार तसेच सोहेल रुस्तुम या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आणि दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनात सुधीर बहिरवाडे, ओमसाई प्रतिष्ठानचे संस्थापक शिवराज गायकवाड, प्रशांत पवार,मैंदर्गीचे सकल हिंदु समन्वयक देवा जक्कापुरे यांचेसह अनेक शिवभक्त तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?






