महाराष्ट्रात समान नागरी कायदा येणार! २९ नोव्हेंबरला राज्यात सर्वत्र जनसुनावणी
सूज्ञ नागरिकांनी गाफील राहू नये; समान नागरी संहिता - महाराष्ट्र : ऑनलाईन वेब पोर्टलवर मते,सूचना,हरकती नोंदवण्याचे आवाहन
(विजयकुमार पिसे)
मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित समान नागरी कायदा महाराष्ट्रात लवकरच लागू होणार आहे. मात्र त्यासाठी केवळ सरकारच कटिबध्द असून चालणार नाही, तर सूज्ञ नागरिकांनी मागे राहता यासाठी मते,सूचना,हरकती नोंदवणे आवश्यक आहे. तसेच यासंदर्भात 29 नोव्हेंबरला राज्यात सर्वत्र जनसुनावणीचे आयोजन केले आहे. तसेच 24 रोजी राज्यातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये शासनाने जाहीर प्रकटन देखील प्रकाशित केले आहे.
समान नागरी संहिता महाराष्ट्रात लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनास शिफारशी करण्यासाठी शासनाने समिती गठित केली आहे. सदर समितीने राज्यातील नागरिकांची मते, सूचना व हरकती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन वेब पोर्टल तयार केले आहे. सदर वेब पोर्टलवर दिनांक 15/12/2026 पर्यंत प्रश्नावलीच्या माध्यमातून नागरिकांना आपली मते, सूचना व हरकती नोंदविता येणार आहेत. समान नागरी संहितेच्या समर्थनार्थ आपले मत नोंदविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रश्नावलीतील पुढील प्रश्नांची उत्तरे देताना खालील बाबी विचारात घ्याव्यात.1) प्रश्न क्र. 1 ते 5 - या प्रश्नांची उत्तरे ङ्गहोयफ अशी नोंदवावीत. 2) प्रश्न क्र. 6 ते 37 - या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे अनिवार्य नाही. आपल्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार व विचारपूर्वक योग्य ती उत्तरे नोंदविता येतील.
आपल्या सोयीसाठी सदर वेब पोर्टलची लिंक खाली देण्यात आली आहे.
https://ucc.maharashtra.gov.in/
तरी सर्वांनी सदर वेब पोर्टलला भेट देऊन समान नागरी संहितेच्या समर्थनार्थ आपले बहुमूल्य मत नोंदवावे, असे आवाहन लक्ष्यवेध न्यूजच्या वतीने करणेत येत आहे.
What's Your Reaction?