पालखी सोहळा : आषाढी निमित्त विहिंपची पालखी मार्गांवर आरोग्य सेवा
विश्व हिंदू परिषदेतर्फे दरवर्षी आषाढी वारीत आरोग्य सेवा, 5 रुग्णवाहिका, 20डॉक्टर, नर्सेस आणि अनेक प्रशिक्षित कार्यकर्ते यांचा सहभाग
(विजयकुमार पिसे)
पुणे : दरवर्षी आषाढी वारीत पालखी मार्गांवर सर्व ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे वतीने आरोग्य सेवा हा उपक्रम राबविला जातो. विहिंप कार्यकर्ते ही वारी 'स्वच्छ आणि पर्यावरणपूरक' व्हावी यासाठी योगदान देतात. संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांवर मोफत आरोग्य सेवा गेली ३९ वर्षे दिली जात आहे.
यंदा आरोग्य सेवा उपक्रमाचे चाळीसावे वर्ष असून पुण्याहून निघणाऱ्या रुग्णवाहिकांचे उद्घाटन १० जुलै रोजी आ. हेमंत रासने आणि इस्कॉन संस्थेचे उपाध्यक्ष श्री श्वेतदीपदास यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री श्वेतदीपदास म्हणाले, वारकरी संप्रदाय, इस्कॉन व विहिंप आपण सगळे बांधवच आहोत. संपूर्ण विश्वभर हिंदू धर्माचे संवर्धन करीत आहेत. आ. हेमंत रासने यांनी, आपले विचार मांडताना, "जोपर्यंत पालखी सोहळा अखंडपणे चालू राहणार आहे , विश्व हिंदू परिषद वारकऱ्यांना विविध सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहणार, अशी खात्री दिली"
प्रारंभी पश्चिम महाराष्ट्र प्रांत सेवा सहप्रमुख डॉ. शर्वरी येरगट्टीकर यांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यातील सेवेचे महत्त्व सांगितले. सेवा मार्ग प्रमुख श्री. पुजारी आणि श्री. वाघ, तसेच आरोग्य सेवेसाठी वारीबरोबर पूर्णवेळ उपस्थित राहणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोरजी चव्हाण यांनी गेले ३९ वर्षे अव्याहतपणे चालू असलेल्या या आरोग्य सेवा उपक्रमाची माहिती दिली.
मुंबई क्षेत्र धार्मिक पुंज प्रमुख श्री संजय मुरदाळे यांनी आरोग्य सेवा उपक्रम कसा सुरू झाला यावर प्रकाश टाकला. गेली दोन वर्षे आरोग्य सेवेबरोबरच अनेक वारकऱ्यांना रेनकोट आणि छत्रीचे वाटप केले जाते. यावर्षी विणेकऱ्यांना खास मोठ्या आकाराची छत्री दिली आहे हे मुरदाळे सरांनी आवर्जून नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे पूर्व विभाग मंत्री श्री संतोष अनगोळकर यांनी केले.
कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्षा लीना भावे,बजरंग दल प्रांत संयोजक श्री नितीन महाजन , धर्मयात्रा विभाग प्रमुख कुंदन तोडकर, धर्मप्रसार प्रांत सहप्रमुख श्री धनंजय गायकवाड, प्रचार प्रमुख श्री संजय गोडबोले, समरसता प्रमुख निखिल कुलकर्णी, दुर्गा वाहिनी प्रांत सहसंयोजिका सौ आरती भारती, विभाग मंत्री केतन घोडके, प्रांत सेवा टोळी सदस्य श्री नाना क्षीरसागर, विभाग सहमंत्री श्री विजय कांबळे, दुर्गा वाहिनी विभाग संयोजिका कार्तिकी परदेशी उपस्थित होते.
कसबा जिल्हा बजरंग दलाने आज वारकऱ्यांची चरण सेवा केली.कार्यक्र पूर्वतरीसाठी भाग मंत्री श्री शैलेंद्र जाधव, विक्रम घुंगुरवाले,गोपाल शिंदे यांच्यासह मातृशक्ती, दुर्गा वाहिनी आणि बजरंग दलाच्या अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?