गृहखात्याने भाकरी फिरवली..तब्बल ७८पोलीस अधिकार्यांच्या बदल्या
तेजस्वी सातपुतेंना पदोन्नती, रंजन शर्मा, सुनील फुलारी,कबाडे, यावलकर,हिम्मत जाधव यांचाही बदलीत समावेश
मुंबई : राज्यात विरोधकांनी लक्ष्य केलेल्या गृहखात्याने अखेर भाकरी फिरवली. तब्बल ७८ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास करणार्या एसआयटी समितीच्या प्रमुख तेजस्वीनी सातपुते यांच्यासह सुनील फुलारी, विजय कबाडे, प्रीतम यावलकर, हिम्मत जाधव तसेच वृष्टी कुशल जैन यांचीदेखील बदली झाली आहे. सोलापूर जि.प.चे सीईओ कुशल जैन यांच्या सौभाग्यवती वृष्टी आहेत. यानिमित्ताने पती,पत्नी बदलीने सोलापुरात आले आहेत. तर सातपुते ह्या पुणे गुन्हे शाखा अप्पर पोलीस आयुक्तपदी जातील, पण खरात प्रकरणाचा तपास त्याच करणार आहेत. त्यांना पदोन्नतीही दिली आहे. सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या बदल्या सोलापूर जिल्ह्यातच झाल्या आहेत.
जि.प. सीईओ कुशल जैन व पोलीस उपायुक्त वृष्टी जैन. पती,पत्नी यांची एकाच जिल्ह्यात सेवा.
राज्यातील १०पोलीस उप महानिरीक्षक, २४अप्पर पोलीस महासंचालक आणि ४४ अधिकार्यांचा बदल्यांमध्ये समावेश केला आहे.सोलापूरला पोलीस अधीक्षक म्हणून गाजवलेल्या तेजस्वी सातपुते यांची राज्य राखीव पोलीस बल पुणे येथून अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर पदावर पदोन्नती झाली आहे. कृष्ण प्रकाश यांची अप्पर पोलीस महासंचालक, फोर्स वन येथून अप्पर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण), सुहेल हक विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय), येथून पोलीस सह आयुक्त (प्रशासन), मुंबई पदावर, सुनील फुलारी कोल्हापूर परिक्षेत्र येथून विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, तर रंजन शर्मा यांची पोलीस सह आयुक्त, पुणे येथून विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र पदावर बदली करण्यात आली. हिम्मत जाधव यांची पुणे शहर येथून पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई पदावर बदली करण्यात आली आहे.
तसेच विजय व्यंकटराव कबाडे यांची पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-1), सोलापूर शहर येथून अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण येथे झाली असून त्यांच्या जागी प्रीतम यावलकर यांची अप्पर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण येथून पोलीस उप आयुक्त, सोलापूर शहर पदावर बदली झाली आहे.
What's Your Reaction?