माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचे निधन

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान

May 12, 2026 - 19:11
May 13, 2026 - 16:25
 0  36
माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचे निधन

सोलापूर : सोलापूरचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते गंगाधर सिद्रामप्पा कुचन यांचे आज, मंगळवार दि. १२ मे रोजी पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

   स्व.कुचन यांची प्रकृती गेल्या दहा दिवसांपासून खालावली होती. अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

 *मृदू स्वभाव, प्रभावी जनसंपर्क* 

गंगाधरपंत कुचन यांनी राजकीय कारकिर्दीत सामान्य जनतेचे प्रश्न हिरीरीने मांडले. राजकारण, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. पद्मशाली समाजासह सर्वच स्तरांतील लोकांशी त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. मृदू स्वभाव आणि विकासात्मक दृष्टीकोन होता. त्यांच्या जाण्याने सोलापूरच्या सार्वजनिक जीवनातील एक अनुभवी मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

   कुचन यांच्या पश्चात दोन मुली, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सोलापुरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हॉस्पिटल आणि त्यांच्या निवासस्थानी धाव घेत श्रद्धांजली अर्पण केली. 

   *लक्ष्यवेध न्यूजच्या वतीने स्व.कुचन यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow