श्री कांची कामकोठी पीठम्, सोलापूर शाखेची नवी कार्यकारिणी

अध्यक्षपदी पंचांगकर्ते मोहन दाते, श्रीहरी म्याकल सचिव

May 12, 2026 - 00:14
 0  26
श्री कांची कामकोठी पीठम्, सोलापूर शाखेची नवी कार्यकारिणी

सोलापूर |  श्री कान्ची कामकोटी पीठम् सोलापूर शाखेची नवी कार्यकारिणी घोषित झाली आहे. अध्यक्षपदी पंचांगकर्ते श्री मोहनजी दाते व सचिव म्हणून श्रीहरी म्याकल यांची निवड करण्यात आली आहे.

   दक्षिण भारतातील कांचीपुरम् येथील जगद्गुरू शंकराचार्यांचे पवित्र पीठ सनातन परंपरेचे आध्यात्मिक केंद्र मानले जाते. या परंपरेतील ६८ वे आचार्य चंद्रशेखरेद्र सरस्वती (परमाचार्य) यांनी दोन वेळा भारत परिक्रमा पदयात्रेद्वारे पूर्ण केली होती. त्या काळात त्यांचा पादस्पर्श सोलापूर व पंढरपूर क्षेत्राला लाभला होता. त्यानंतर जयेंद्र सरस्वती व विजयेंद्र सरस्वती यांनीही सोलापूर येथे मुक्काम केला होता. सोलापुरात या पीठाचे असंख्य भक्त आहेत. बांधकाम व्यावसायिक श्री अंबादास मिठ्ठाकोल यांनी अक्कलकोट रोड, ओम अवंती नगर, कृष्णा पार्क परिसरात एक एकर जागा संस्थेला देणगी स्वरूपात प्रदान केली आहे. येथे “कांची कामाक्षी मंदिर” व “शंकर मठ” उभारण्याचा संकल्प असून धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा मानस आहे.तसेच यानिमित्त सोलापूर शाखेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.

    सोलापूर शाखा कार्यकारिणी:

श्री मोहनराव दाते: अध्यक्ष, वेंकटेश चिलका: उपाध्यक्ष, श्रीहरी म्याकल: सचिव, श्रीधर म्याकल: सहसचिव, अंबादास मिठाकोलःखजिनदार,जयेन्द्र श्रीगांधी:सदस्य,गोवर्धन चाटला: सदस्य, योगेश म्याकल: सदस्य, पांडुरंग दिड्डी:सदस्य, दयानंद करमपुरी: सदस्य, महेंद्र चाटला: सदस्य,गणेश बुधाराम: सदस्य, 

वेणुगोपाल मालपुरी:सदस्य.

    नवीन कार्यकारिणीने मंदिर व मठ उभारणीच्या कामास लवकरच गती देण्याचा संकल्प केला असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow