पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद.. विप्रो कंपनीतील हिंदू महिला कर्मचार्‍यावर धर्मांतरासाठी दबाव! हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

हिंजवडीतील आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्याने धार्मिक छळ आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. विविध संघटनांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Jun 9, 2026 - 11:35
 0  11
पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद.. विप्रो कंपनीतील हिंदू महिला कर्मचार्‍यावर धर्मांतरासाठी दबाव!  हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

   पुणे : नाशिकच्या टीसीआय कंपनीतील कार्पोरेट जिहादच्या पाठोपाठ हिंजवडी आयटी सेक्टर क्षेत्रातही कॉर्पोरेट जिहादचा प्रक़ार उघडकीस आल्यामुळे पुणेकर हादरले आहेत. हेे भीषण वास्तव समोर आले आहे. नामांकित विप्रो  कंपनीतील एका हिंदू महिला कर्मचार्‍याचा धार्मिक छळ करून, तिच्यावर बळजबरीने धर्मांतरासाठी दबाव आणल्याची धक्कादायक घटनेचे वास्तव समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद सादिक याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात विहिंप बजरंग दल आणि हिंदू  जनजागृती समितीने माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
   विप्रो कंपनीत कार्यरत एका हिंदू महिला कर्मचार्‍याने तिच्याच सोबत काम करणार्‍या मोहम्मद सादिक या सहकार्‍यावर गंभीर आरोप केले आहेत. सादिक हा गेल्या काही काळापासून या महिलेचा मानसिक व धार्मिक छळ करत होता, तसेच तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी सातत्याने बळजबरी करत होता. या जाचाला कंटाळून अखेर पीडित महिला कर्मचार्‍याने पोलिसांत धाव घेतली. यासंदर्भात पीडित महिला कर्मचार्‍याने माध्यमांसमोर येत या धक्कादायक घटनेचा पर्दाफाश केला. 
   पीडिताने दिलेल्या माहितीनुसार कंपनीतील एक सहकारी शाहीना रफीक पीडितेला म्हणायची,  तू इस्लाम कबूल कर. हेडबरोबर संबंध प्रस्थापित कर. ते लोक खूप आनंदात आणि मजेत तुला ठेवतील. गाडी, बंगला मुलं सगळं तुझ्याकडे असेल. तू असं मिजरेबल आयुष्य का जगतेस? याशिवाय  तू  कशी  काय  जगते आहेस? याबाबत तक्रार केल्यानंतर एच आर मॅनेजर झिशान तिला म्हणतो की, ही तक्रार कुठेही जाणार नाही, या तक्रारीचे पुढे काहीही होणार नाही, तुलाच रिझाईन करावं लागेल. आणि अखेर तसंच झालं. तिला राजीनामा द्यावा लागला. पीडितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  दरम्यान या संदर्भात विप्रो कंपनीने खुलासा करून आपली बाजू मांडली आहे. 
   हिंदू जनजागृती समितीने पुण्यात तातडीने पत्रकार परिषद  घेतली. आयटी क्षेत्रासारख्या उच्चशिक्षित आणि कॉर्पोरेट वर्तुळातही अशा प्रकारे पद्धतशीरपणे हिंदू महिलांना लक्ष्य केले जात असल्याबद्दल समितीने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हा प्रकार म्हणजे 'कॉर्पोरेट जिहाद'चाच एक भाग असून, अशा प्रवृत्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow