प.पू.सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत गुरुवारी सोलापुरात

उद्योगवर्धिनीच्या रौप्य महोत्सवानिमित्त परिवार उत्सव, विजयपूर जिल्ह्यातील डॉ. गुरूदेव रानडेंच्या निंबाळ आश्रमात सरसंघचालकांची साधना, यानिमित्त संघ स्वयंसेवकांसाठी पर्वणी

Jul 11, 2025 - 16:22
Jul 11, 2025 - 22:37
 0  484
प.पू.सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत गुरुवारी सोलापुरात

(विजयकुमार पिसे)

रा.स्व.संघाचे प.पू.सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत येत्या गुरुवारी 17 जुलै रोजी सोलापुरात येत असून उद्योगवर्धिनीच्या रौप्य महोत्सवानिमित्त डॉ.भागवत परिवार उत्सवात मार्गदर्शन होणार आहे. तत्पूर्वी सरसंघचालक विजयपूर जिल्ह्यातील अध्यात्मिक गुरूदेव रानडे यांच्या निंबाळ येथील आश्रमास भेट देणार आहेत. दोन दिवसीय वास्तवात साधना करणार आहेत. 

     निंबाळ येथील डॉ.गुरूदेव रानडे यांच्या आश्रमात साधक म्हणून गेली अनेक वर्षे सरसंघचालक डॉ.भागवत येतात. यानिमित्त त्यांचा सोलापूर प्रवासही नियोजित असतो. या दरम्यानच्या काळात स्वयंसेवकांशी संवाद, भेट, बैठकीची पर्वणी सोलापुरातील पदाधिक़ारी व कार्यकर्ते यांना लाभते. कोरोना काळातील अपवाद वगळता दरवर्षी सरसंघचालकांचा गुरूपौर्णिमा दरम्याच्या काळात भेटीचा योग येतो.  

    25 वर्षापूर्वी संघप्रचारक भारतरत्न स्व.नानाजी देशमुख यांच्या आशीर्वादाने उद्योगवर्धिनीचे रोपटे लावण्यात आले होते. यंदा या संस्थेचा रौप्यमहोत्सव आहे. हा योग साधून परिवार उत्सव सोहळ्याचे आयोजन हुतात्मा स्मृती मंदिरात येत्या गुरुवारी 17 जुलै रोजी सकाळी 10 वा. केले आहे. परिवार उत्सव कार्यक्रम उद्योगवर्धिनीच्या फक्त निमंत्रितांसाठी आहे.

     उद्योगवर्धिनीच्या संस्थापिका चंद्रिका चौहान यांनी स्त्री शक्तीचे जागरण करून समृध्द आणि स्वाभिमानी आयुष्याचा प्रवास उद्योगवर्धिनीच्या माध्यमातून केला आहे. संघ परिवारात भाभी म्हणून सुपरिचित चौहान या मूळच्या गुजरातच्या माहेरवाशिण, विवाहानंतर राजस्थानच्या झाल्या. सोलापूर ही त्यांची कर्मभूमी झाली आहे. गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र असा त्यांच्या सामाजिक जीवनाचा प्रवास आहे. त्यांचे पती शंभुसिंग चौहान हे काही काळ संघप्रचारक होते. त्यांची प्रेरणा चंद्रिका भाभींच्या वाटचालीत आहे. माजी खासदार स्व.लिंगराज वल्याळ यांच्या प्रेरणेने भाजपाच्या नगरसेविका म्हणूनही राजकीय क्षेत्रात त्यांनी दहा वर्षे काम केले. नंतर संघाच्या सेवाकार्यात उद्योगवर्धिनीच्या रूपाने त्यांनी मानदंड प्रस्थापित केला आहे. लक्ष्यवेध न्यूजतर्फे उद्योगवर्धिनीस शुभेच्छा।

संघाचे.. सेवा है यज्ञकुंड। तीन सेवाकार्ये

  1989 डॉ.हेडगेवार जन्मशताब्दीत संघाने देशभरात सेवाकार्य उभे केले. सोलापुरात डॉ.हेडगेवार रक्तपेढीची सुरवात झाली. येत्या रविवारी 20 जुलै रोजी रक्तपेढीचा 35 वा रक्तदाता कृतज्ञता स्नेहमेळावा आहे. दुसरे सेवाकार्य उद्योगवर्धिनी. यंदा या संस्थेचा रौप्य महोत्सव आहे. काल गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर 16 वर्षापूर्वी बंद पडलेले सुप्रसिध्द वाडिया हॉस्पीटल सोलापूरकरांच्या रुग्णसेवेत पुन्हा सुरू झाले आहे. या हॉस्पीटलसाठी रा.स्व.संघाने पुढाकार घेतला आहे. संघाच्या माध्यमातून सेवाकार्यात निरपेक्ष सेवेचे हे मानदंड मानता येईल. सेवा है यज्ञकुंड....।

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow