जुळे सोलापुरात बॉम्बे पार्क दरम्यान खड्डेमुक्त रस्ता, नगरसेविका राजश्री चव्हाणांच्या प्रयत्नाला यश

जुळे सोलापुरात बॉम्बे पार्क दरम्यान खड्डेमुक्त रस्ता, नगरसेविका राजश्री चव्हाणांच्या प्रयत्नाला यश

Jul 8, 2025 - 00:27
 0  27
जुळे सोलापुरात बॉम्बे पार्क दरम्यान खड्डेमुक्त रस्ता, नगरसेविका राजश्री चव्हाणांच्या प्रयत्नाला यश

प्रभाग 26 जुळे सोलापुरातील सैफुल ते बॉम्बे पार्क दरम्यान पाच वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले. या ठिक़ाणी ड्रेनेजचे काम, नळ कनेक्शन व पावसामुळे अनेक खड्डे पडले होते. याचा त्रास विद्यार्थी, महिलावर्ग, वाहनधारक, ज्येष्ठ नागरिक होतो. 

     याबाबत मनपा व झोन कार्यालयात तक्रारीही आल्या होत्या. नगरसेविका राजश्री अनिल चव्हाण यांना नागरिकांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर आयुक्त सचिन ओंबासे व नगर अभियंता कार्यालय यांना निवेदन दिले. प्रशासनाने तातडीने सैफुल ते बॉम्बे पार्क रस्त्याचे डांबरी रिमिक्स टाकून रस्ता व्यवस्थित करून दिला. नगरातील नागरिकांनी सुटकेचा नि:स्वास सोडला. सदर समस्या सोडवल्याबद्दल नगरसेविका राजश्री यांचे आभार व्यक्त केले.

    आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, नगरसेवकांचा कार्यकाल संपला असून प्रशासन राजवट सुरू आहे. नगरसेविका राजश्री चव्हाण या सातत्याने नागरिकांच्या समस्यांचा पाठपुरावा करतात. हे विशेष.  

    अशा नागरिकांच्या समस्यांसाठी धावून येणार्‍या नगरसेविका राजश्री चव्हाण व त्यांचे पती भाजपचे सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण हे धावून येतात व समस्या सोडवतात त्यामुळे जुळे सोलापुरातील नागरिक शासन कार्याचे कौतुक करत आहेत.           

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow