डॉ.वळसंगकर आत्महत्येचे कारण "ती"
डॉक्टरांच्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक माहिती, सदर महिलेस अटक, न्यायालयातून तीन दिवसांची पोलीस कोठडी, डॉक्टर मुलगा अश्विन वळसंगकर यांची फिर्याद

सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या, त्यानंतर सापडलेली सुसाईड नोट, यामधून धक्कादायक माहिती समोर आली असून डॉक्टरांच्या आत्महत्येस ती महिला कारणीभूत आहे. त्यामुळे डॉक्टर अश्विन वळसंगकर यांच्या फिर्यादीवरून हॉस्पिटल स्टाफ मनीषा माने या महिलेस अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर महिलेस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
डॉ. शिरीष वळसंकर
यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? त्यांना कोणी यासाठी प्रवृत्त केले का? यासंदर्भात पोलिस तपास सुरु असून या प्रकरणी सदर महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
डॉ.वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल देखील झाला आहे.
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिट्ठी माहिती लिहिली होती. यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. काल रात्री 10 च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला तसेच रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन सदर महिलेला अटकही करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लकडे यांनी महिलेस न्यायालयात उभे केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीमध्ये डॉक्टरांनी म्हटलंय की, ज्या महिलेला आयुष्यात उभे केले, प्रशासकीय अधिकाराची सूत्रे दिली त्याच महिलेने माझ्यावर घाणेरडे आरोप केले आहेत. हे आरोप सहन होत नाहीत त्यामुळे मी जीवन संपवत आहे. 18 एप्रिल रोजी रात्री 8.30 च्या सुमारास पंखा विहीर जवळील राहत्या घरी डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती.
What's Your Reaction?






