भाजपाचे सोशल इंजिनिअरिंग! पण आमदारांचीच राखली मर्जी...
पडसाद... शहर अध्यक्ष बदलाची ही नांदी! मंडल अध्यक्ष निवडीचा केवळ सोपस्कार, वयोमर्यादा डावलून पदावर नियुक्ती, मतदार संघाच्या बाहेरच्यांना संधी, परिवाराने जोडलेला मोची समाज राहिला उपेक्षित

(विजयकुमार पिसे)
पार्टी विथ डिफरन्स ही भाजपाची व्याख्या, पक्षात मतभेद जरूर असावेत, पण मनभेद असू नयेत, याची वारंवार पुनरुक्ती करूनही प्रदेश स्तरावरूनच केवळ म..म.. म्हणा आणि स्थानिक नेते/आमदार यांच्या मर्जीनेच मंडल अध्यक्ष निवडण्याचा सोपस्कार सोलापुरी भाजपात झाल्याचे दिसून येत आहे. काही मंडल अध्यक्षांनी पक्षाने निश्चित केलेली वयोमर्यादा ओलांडली तर काही ठिकाणी मतदारसंघाबाहरील प्रदेश पदाधिकार्याची नियुक्ती झाली आहे. काही भागात विद्यमान मंडळींनाच पुन्हा संधी दिल्यामुळे अन्य इच्छुक नाराज झालेत. या सर्व गदारोळात (मतभेदावर बंद खोलीत पांघरूण घातले, पण मनभेद वाढले.) भाजपाच्या पाठिशी परिवाराने जोडून दिलेला मोची समाज उपेक्षित राहिला. या एकंदर घडामोडीचे पडसाद शहर अध्यक्ष निवडीवर होईल, अशी चर्चा प्रमुख नेत्यांमध्ये सु़रू आहे. परंतु बाजार समिती निवडणुकीत आमदारांचा झालेला एकोपा पाहता विद्यमान अध्यक्ष नरेंद्र काळे निश्चिंत दिसत आहेत. दरम्यान मंडल अध्यक्ष निवडीत पक्षाने सोशल इंजिनिअरिंग साधल्याचा दावा देखील केला जात आहे.
सोमवारी सोलापूर शहरातील आठ मंडल अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया बिनविरोध पार पडली. दुपारनंतर नवीन मंडल अध्यक्षांच्या अभिनंदनाचे शुभेच्छांचे फोटो व्हायरल झाले. पाठोपाठ जे प्रमुख दावेदार होते, त्यांनी नियमबाह्य पध्दतीने निकष डावलून मंडल अध्यक्ष कसे निवडले गेले, याविषयीची पोस्ट प्रदेश पदाधिक़ारी आणि संघटनमंत्र्यांकडे शेअर केली. त्यामुळे मंडल अध्यक्ष निवडीत आलबेल झाल्याचे निदर्शनास आले आहे.
गिरीश बत्तुल यांची ती पोस्ट..... माजी उपमहापौर शशिकला बत्तुल यांचे सुपुत्र विद्यमान मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल यांची पोस्ट व्हायरल झाली असून, यामध्ये त्यांनी म्हटलंय की, मध्यपूर्व मंडल अध्यक्ष निवडीची प्रक़्रिया अनुचित प्रक़ारे झाली आहे. अंजीखाने मध्यपूर्व मंडलमध्ये राहात नाहीत, तसेच त्यांचे मतदान या मंडलमध्ये नाही. या मंडलात 16 पदाधिकारींपैक़ी 15 जणांनी माझ्या नावाची शिफारस केली असताना आपल्याला डावलून अध्यक्ष निवडला गेला आहे. याशिवाय अन्य एक दुसरे मंडल अध्यक्षांचे वय 45 वर्षेपेक्षा जास्त आहे. वयोमर्यादा डावलून निवड झाली, शिवाय ते मतदारसंघाबाहेरचे आहेत. या झालेल्या निवडी पाहता ही प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने पार पडली आहे.*
*भाजपाचे सोशल इंजिनिअरिंग : *शहर उत्तर: पश्चिम/देविदास बनसोडे, उत्तर मध्य/दत्ता बडगू, उत्तर पूर्व/सिध्दार्थ मंजेली. *शहर मध्य : मध्य पूर्व/अक्षय अंजीखाने, शहर मध्य/नागेश सरगम, मध्य पश्चिम/नागेश खरात. *दक्षिण सोलापूर : दक्षिण पूर्व/अर्जुन जाधव, दक्षिण पश्चिम/महेश देवकर.
*दोन धनगर, दोन पद्मशाली आणि मराठा,वडार,गवळी आणि मागासवर्गीय प्रत्येकी एकेक मंडल अध्यक्ष. यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोची समाज निर्णायक रितीने भाजपाच्या पाठिशी राहिला. परिवाराने या समाजाला जोडून दिले होते. परंतु या समाजाची दखल संघटनस्तरावर घेतली गेली नाही, याविषयीची खंत व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?






