प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंकर यांची आत्महत्या

डॉक्टरानी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी

Apr 18, 2025 - 23:39
 0  1087
प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंकर यांची आत्महत्या

सोलापूर शहरातील अतिशय प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी 18 एप्रिल 2025 रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरी हा प्रकार घडला. सात रस्ता परिसरातील सोनामाता शाळेच्या शेजारी त्यांचा बंगला आहे. डॉक्टर वळसंगकर यांनी आपल्या डोक्यात गोळी मारून घेतलेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने त्यांचे मोदी भागातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

    दरम्यान डॉ. वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी का झाडून आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करीत आहेत. सोलापूर जिल्ह्य़ातील पहिले न्यूरो सर्जन अशी त्यांची ख्याती होती. तणावातून आत्महत्येचा प्रकार घडला, अशी प्राथमिक माहिती आहे. अलीकडील काळात डॉक्टरने आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना आहे. काळजापूर मारुती भागातील ती घटना होती. आजारपण व तणाव यातून अशा घटना घडल्या आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow