औरंगजेबची कबर, त्यांना खबर

विश्‍व हिंदू परिषदेवर पोलिसिंग पाळत ठेवण्याचा प्रकार उघडकीस

Mar 17, 2025 - 14:25
 0  385
औरंगजेबची कबर, त्यांना खबर

(विजयकुमार पिसे)

भारताच्या छताडावरील अत्याचारी, दुराचारी आणि व्याभिचारी औरंग्याची कबर उखडून टाका, अन्यथा आम्ही कारसेवा करून उखडून टाकणार, अशी घोषणा विश्‍व हिंदू परिषद बजरंग दलाने केल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीला विशेष पोलिस संरक्षण दिले आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापुरात विश्‍व हिंदू परिषद बजरंग दलाच्या पदाधिकार्‍यांवर पोलीस प्रशासनाने पोलिसिंग सुरू केली आहे. रविवारी आयोजित एका नियोजित बैठक़ीप्रसंगी पोलिसांची पाळत असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान सोलापुरात सोमवारी औरंगजेबची कबर काढून टाकण्याच्या मागणीसाठी विहिंप बजरंग दलाने निदर्शने आयोजित केली आहेत.

    औरंग्याची कबर काढून टाका, या विहिंपच्या मागणीस राज्यभरात पाठिंबा मिळत असून सोमवारी सर्वत्र निदर्शने आणि जिल्हा प्रशासनास निवेदने देण्यात येणार आहेत. या आंदोलनात सकल हिंदू समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहन विहिंपने केले आहे. रविवारी सोलापुरात विहिंपची पूर्वनियोजित बैठक होती. जिल्हाभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समाजातील काही मान्यवर यांनाही आमंत्रित केले होते. तसेच या बैठकीस केंद्रीय आणि प्रांत पदाधिकारी यांचे मार्गदर्शन झाले. उपस्थितांचा औपचारिक परिचय करून देताना या बैठक़ीत पोलीस खात्याच्या विशेष शाखेतील पोलीस कर्मचारी उपस्थित होता. त्यानेही आपला परिचय दिला, तेव्हा त्यास हटकले. परवानगीशिवाय बैठकीस येण्याच्या हेतूबद्दल जाब विचारला. तसेच सभागृहातून बाहेर जाण्यास फर्मावले. हा प्रकार घडल्यानंतर पोलिस प्रशासन विहिंपवर पोलिसिंग करत असल्याचे उघडकीस आले. औरंग्याची कबर हटवण्याच्या मागणीस जसा जोर येईल, तसा त्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासन यापुढील काळात विहिंप बजरंग दलाच्या बैठका, कार्यक्रम आणि पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवणार असे दिसते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow