सोलापूर शहरांतील दोन्ही उड्डाण पुल कामाचे ११०० कोटींची निविदा निघाली

एकूण साडेबारा किमी ची दोन उड्डाणपुल आ. विजय देशमुख यांच्या मागणीला यश

Aug 20, 2024 - 08:34
 0  249
सोलापूर शहरांतील दोन्ही उड्डाण पुल कामाचे ११०० कोटींची निविदा निघाली
संग्रहित छायाचित्र

कित्येक वर्षापासून शहरवासियांत बहूचर्चीत उड्डाणपूल विषय होता,तत्कालीन माजी राज्यमंत्री आमदार विजय देशमुख यांनी सोलापूर शहरांसाठी मागणीनुसार १) जुना पुणे नाका ते सात रस्ता आणि पत्रकार भवन २) विजापूर रोड ते बोरामणी नाका या दोन्ही उड्डाणपूलांच्या कामाची निविदा प्रक्रिया अखेर निघाली निघाली असून सोलापूर शहरवासियांचे उड्डाणपूल मार्गाचे स्वप्न लवकरच प्रत्यक्ष पूर्ण होणार आहे.

आमदार विजय देशमुख यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.उड्डाणपूलासाठी काही ठिकाणी भूसंपादनसाठी वाढीव ३०० कोटी रुपयांची गरज होती. आ. विजय देशमुख यांनी त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून हा वाढीव निधी मिळविला. दोन्ही उड्डाणपूलांची एकूण लांबी साडेबारा किलोमीटर पर्यंत असून सर्वाधिक लांबीच्या असलेल्या उड्डाणपूलांमध्ये याचा समावेश होणार आहे.

सप्टेंबर महिन्यापर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला ऑक्टोंबर महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे, याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे आमदार विजय देशमुख यांनी केंद्रीय मंत्री गडकरी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार व्यक्त केलं आहे.

शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी वाढत चालली होती. ही दोन्ही उड्डाणपूल पूर्णत्वास आल्यास प्रवाशांचा वेळ वाचून इंधनाची बचत होणार आहे. यासह शहरातील वाहतुकीची वाढत चाललेली कोंडी मोठ्या प्रमाणात सुटेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow