सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅली यात्रा
पहेलगाम हल्ल्याविरुध्द ऑपरेशन सिन्दूर, भारतीय सैनिकांचे शौर्य आणि सन्मानार्थ भाजपतर्फे भव्य तिरंगा रॅली...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीस पुष्पचक्र वाहून तिरंगा यात्रेस प्रारंभ झाला. यावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतनसिंग केदार, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी आ. नरसिंग मेंगजी यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, भारताच्या सैन्यदलाने पाकिस्तानात घुसून पाकिस्तानला धडा शिकवला. अत्यंत अतुलनीय शौर्य गाजविले.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, भारतीय सैनिकांच्या पराक्रमा पुढे पाकिस्तानने गुडघे टेकले. निष्पाप भारतीयांची हत्या करणाऱ्या अतिरेक्यांचा सूड सैनिकांनी घेतला. त्यामुळे संपूर्ण देशभरात समाधानाचे वातावरण आहे. भारताच्या तिन्ही सैन्यदलाच्या कारवाईला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे तिरंगा यात्रेत सहभाग घेतला. मार्कंडेय उद्यानापासून सुरुवात झालेली ही तिरंगा यात्रा अशोक चौक, साईबाबा चौक, ७० फूट रस्ता मार्गे माधवनगर पद्म मारुती मंदिर येथे विसर्जित झाली.
या तिरंगा यात्रेत माजी खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ.देवेंद्र कोठे, माजी आ. राजेंद्र राऊत, माजी आ. नरसिंग मेंगजी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, केदार सावंत, माजी अध्यक्ष विक्रम देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश महागावकर, रंजीता चाकोते, सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, किसन जाधव, जगदीश पाटील, चन्नवीर चिट्टे, विनायक कोंड्याल, कुमुद अंकारम, राधिका पोसा, गुरुशांत धुत्तरगावकर, विठ्ठल कोटा, अनिल पल्ली, मेघनाथ येमुल, उपाध्यक्ष श्रीनिवास करली, श्रीनिवास पुरुड, आनंद बिर्रू, रवी कैय्यावाले, राजकुमार हंचाटे, रामदास मगर, डॉ. राजेश अनगिरे, काशिनाथ झाडबुके, उपाध्यक्ष भूपती कमटम, जय साळुंखे, श्रीनिवास दायमा, चिटणीस सुनील गौडगाव, बजरंग कुलकर्णी, मंडल अध्यक्ष अक्षय अंजीखाने, नागेश सरगम, नागेश खरात, रवी कोळेकर, गणेश साळुंखे सत्यनारायण गुर्रम, राजमहिंद्र कमटम, ज्ञानेश्वर म्याकल, शशी थोरात, मोनिका कोठे, श्रीनिवास चिलका, राधिका चिलका, धनश्री कोंड्याल, वैशाली गोली, अंबादास करगुळे, नागनाथ कासलोलकर, देवेंद्र भंडारे, जेम्स जंगम, व्यंकटेश कोंडी, सुनील पाताळे, अविनाश बेंजरपे, शिवकुमार कामाठी, शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, अशोक संकलेचा, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव सचिव दशरथ गोप, प्रशांत बडवे, विठ्ठल बडगंची, अशोक कटके, मल्लिनाथ याळगी, यशवंत पाथरुट, महेश बनसोडे, लेबर फेडरेशनचे शंकर चौगुले, सुधीर बहिरवाडे, सकल हिंदू समाजाचे शिवराज गायकवाड, हिंदूराष्ट्र सेनेचे रवी गोणे, संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे, शिवराम वाडेकर, गोपाळ सोमाणी, मोहन सचदेव, झाकीर सगरी, जाकीरहुसेन डोका, सोलापूर विकास मंचचे केतन शहा, मोची समाज अध्यक्ष देवेंद्र भंडारे, भुसार अडत व्यापारी संघाचे सुरेश चिककळी, उद्योग आघाडीचे अंबादास बिंगी, सुधाकर गुंडेली, वेणूगोपाल जिल्हा पंतुलू, दिलीप पतंगे, मारेप्पा कंपली, दत्ता पाटील, रमेश यन्नम, शेखर फंड,सावित्रा पल्लाटी, सिद्धेश्वर कमटम, अभिषेक चिंता, अंबादास सकीनाल, रवी भवानी, विश्वनाथ प्याटी, राजशेखर येमूल, बाबुराव शिरसागर, किरण भंडारे, मनोज कलशेट्टी, सुनील दाते, महेश अलकुंटे आदी सहभागी झाले होते.
What's Your Reaction?






