संघ शिक्षा वर्गातून देशभक्त पिढीचे कार्य : महेश करपे

रा.स्व संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघ शिक्षा वर्गाला प्रारंभ 288 शिक्षार्थी सहभागी

May 17, 2025 - 11:13
 0  112
संघ शिक्षा वर्गातून  देशभक्त पिढीचे  कार्य : महेश करपे

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संघ शिक्षा वर्ग म्हणजे देशभक्तांची पिढी तयार करण्याचे कार्य  आहे. समाजानेही संघ कार्याचा स्वीकार केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य अविरत सुरू आहे असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सह कार्यवाह महेश करपे यांनी केले.  
  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाचा प्रारंभ हरिभाई देवकरण प्रशालेत झाला. याप्रसंगी ते स्वयंसेवकांना संबोधित करत होते. या वर्गामध्ये  प्रांतातून २८८  स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. प्रारंभी भारतमाता पूजनाने वर्गाची सुरुवात झाली. १६ मे ते  १ जूनपर्यंत हा वर्ग आहे. वर्गासाठी  प्रांतामधील विविध जिल्ह्यांमधून स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.   या वर्गात तरुणांची संख्या लक्षणीय आहे.

पहाटे योग, शारीरिक व्यायाम, नियुद्ध (कराटे), दंड,  गटश: चर्चा, बौद्धिक, विचारमंथन, चिंतन, सायंकाळी संघस्थान असे कार्यक्रम आहेत. त्याशिवाय सेवा, संपर्क, प्रचार या विषयांचे  प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
    यावेळी  पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहकार्यवाह महेश करपे यांनी  संघ शिक्षा वर्गाचे महत्त्व  सांगताना रा.स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित उपक्रम विशद केले. 
सर्वाधिकारी ॲड. प्रशांत यादव, वर्ग कार्यवाह  ॲड. आनंदराव कुलकर्णी जबाबदारी पार पाडणार आहेत. श्रीनिवास पुलय्या  वर्गाचे पालक, अक्षय खांडेकर हे मुख्य शिक्षक आहेत. 
   पंधरा दिवस चालणाऱ्या या वर्गात सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १०: ३० पर्यंत, वेळेचे नियोजन, शारीरिक, बौद्धिक प्रशिक्षण यासोबतच सेवाव्रत, सामाजिक समरसता या बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow