सेवा फाउंडेशनचे संस्थापक प्रकाश राठोड यांच्या वतीने भाजपा शहर अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांचा सत्कार.

सेवा फाउंडेशनचे संस्थापक प्रकाश राठोड यांच्या वतीने भाजपा शहर अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांचा सत्कार.

May 18, 2025 - 14:22
 0  47
सेवा फाउंडेशनचे संस्थापक  प्रकाश राठोड यांच्या वतीने भाजपा शहर अध्यक्षा  रोहिणीताई तडवळकर यांचा सत्कार.

जनसेवा हीच ईश्वर सेवा ह्या उद्देशाने जुळे सोलापुरातील इचगिरी मठ समोर कुबेर कॉम्प्लेक्स येथे जनतेची कामे मोफत निस्वार्थीपणे करण्यासाठी निवृत्त सहाय्यक आयुक्त ठाणे  प्रकाश राठोड यांनी नव्याने कार्यालय सुरू केले आहेत. या कार्यालयात  नागरिकांना  शासकीय योजना,  आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, आयुष्यमान कार्ड, ईश्रम कार्ड असे विविध सेवा मोफत  दिले  जाते.  आतापर्यंत शेकडो लोकांनी लाभ घेतलेला आहे.     


   सदर सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष  प्रकाश राठोड निवृत्त सहाय्यक आयुक्त ठाणे यांनी सोलापूर भाजपच्या नूतन  शहर अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांनी  सदर कार्यालयात भेट दिली.  राठोड यांनी  केलेल्या कार्याबद्दल माहिती घेतली.  तदनंतर ममता राठोड यांनी  रोहिणी  तडवळकर यांचे औक्षण करून सत्कार करण्यात आला. 
  यावेळी  भाजपा शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांनी प्रकाश भाऊ राठोड यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असून व त्यांच्या प्रशासकीय कामाचा प्रचंड अनुभव याच्या जोरावर नागरिकांची कामे जलद गतीने होतील तसेच भविष्यात त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.  तसेच जनतेसाठी निस्वार्थीपणे मोफत सेवा फाउंडेशनच्या वतीने महत्त्वाची कामे करीत असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. 
 तसेच प्रकाश भाऊ राठोड यांच्या महत्त्वाची मागणी असलेली प्रताप नगर येथे नव्याने स्मशानभूमीसाठी सर्वतोपरी प्राधान्याने मदत करण्याचे ठोस आश्वासन दिले.
यावेळी प्रभाग 26 च्या लोकप्रिय नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण, नगरसेविका सौ.संगीता जाधव, भाजपा महिला आघाडी चिटणीस सौ.संपदा जोशी,भाजपचे सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल चव्हाण, नेहरू राठोड, उमेश चव्हाण,राजेश चव्हाण, आकाश चव्हाण,तुकाराम राठोड, सागर राठोड,सुरज राठोड, समाजसेविका सौ.ममता राठोड, सुमित राठोड,सौ.रिंकू राठोड,पूजा राठोड यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow