एसजेएसबीच्या अध्यक्षपदी पेंडसे,उपाध्यक्ष अॅड.कुलकर्णी यांची निवड
बिनविरोध निवडीची परंपरा कायम; अध्यक्ष,उपाध्यक्षांना पुनश्च संधी
सोलापूर : सहकार क्षेत्रामधील प्रथितयश बँक सोलापूर जनता सह.बँकेच्या (एसजेएसबी) चेअरमनपदी पुनश्च श्री. सुनील पेंडसे आणि उपाध्यक्षपदी अॅड. मिलिंद कुलकर्णी (माळशिरस) यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेची नुकतीच पंचवार्षिक़ निवडणूक झाली, तीमध्ये परिवार पॅनलचे सर्व उमेदवार निर्वाचित झाले होते. आज नूतन संचालक मंडळाची बैठक पार पडली. त्यांनी एकमताने पेंडसे आणि अॅड.कुलकर्णी यांची निवड केली. नूतन पदा़िधकारी व संचालकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी निवडणूक़ अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख व जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिक़ारी विनय दुनाखे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी पेंडसे आणि अॅड.कुलकर्णी यांचेच एकमेव अर्ज आले होते. त्यामुळे उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सोलापूर जनता बँकेच्या अध्यक्षपदासाठी पेंडसे आणि उपाध्यक्षपदासाठी अॅड. कुलकर्णी यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. देशमुख यांनी अध्यक्ष सुनील पेंडसे आणि उपाध्यक्ष अॅड. मिलिंद कुलकर्णी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
निवडणूक प्रक्रियेदरम्यात बँकेचे नवीन संचालक पुरुषोत्तम उडता, राजेश पवार, सी. ए. गिरीश बोरगावकर, रवींद्र साळे, संचालिका चंद्रिका चौहान, गौरी आमडेकर, संचालक डॉ. हर्षद डंबळ, सी. ए. आनंद करवंदे, सुरेश चिक्कळी, महादेव न्हावकर, प्रमोद भुतडा, विष्णू मोंढे, अॅड. मल्लिनाथ शहाबादे, अमित आपटे, चरणसिंग चौहान, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे उपस्थित होते. बँकेच्या प्रशासनाकडून नूतन संचालकांचा सत्कार सोलापूर जनता सहकारी बँकेचे नूतन अध्यक्ष सुनील पेंडसे आणि उपाध्यक्ष अॅड. मिलिंद कुलकर्णी तसेच सर्व संचालक मंडळाचा सत्कार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बँकेचे सरव्यवस्थापक प्रदीप बुट्टे, उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी, देवदत्त पटवर्धन, मकरंद जोशी, सहाय्यक सरव्यवस्थापक रामदास सिद्धूल, तुळशीदास गज्जम, रमेश मामड्याल, मुख्य कार्यालयातील अधिकारी मदन मोरे, सुहास कमलापूरकर उपस्थित होते.
What's Your Reaction?