विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष पदी डॉ.विष्णू मोंढे, उपाध्यक्ष ॲड.केदार पाटील,जिल्हा मंत्री जयदेव सुरवसे

विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष पदी डॉ.विष्णू मोंढे, उपाध्यक्ष ॲड.केदार पाटील,जिल्हा मंत्री जयदेव सुरवसे

Apr 7, 2026 - 23:49
Apr 8, 2026 - 00:06
 0  10
विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष पदी डॉ.विष्णू मोंढे,  उपाध्यक्ष ॲड.केदार पाटील,जिल्हा मंत्री जयदेव सुरवसे

सोलापूर |   विश्व हिंदू परिषद (विहिंप) सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी डॉ. विष्णू मोंढे, जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड. केदार पाटील (शेळगीकर) आणि जिल्हा मंत्रीपदी जयदेव सुरवसे यांची निवड करण्यात आली आहे. ही घोषणा विहिंप पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी केली. विहिंप नूतन पदाधिकारी यांचे विभाग मंत्री विजयकुमार पिसे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

दि. ५ एप्रिल रोजी पुणे येथे पार पडलेल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत बैठकीत या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. या बैठकीस प्रा. गजानन धरणे अध्यक्षस्थानी होते. तसेच केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे, क्षेत्र संघटन मंत्री अनिरुद्ध अण्णा पंडीत, प्रांत उपाध्यक्षा माधवी सौन्शी, प्रांत सहमंत्री ॲड. सतीश गोरडे आणि नितीन वाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ. विष्णू मोंढे हे मोंढे मोटर्स (रॉयल एनफिल्ड डीलरशिप)चे संचालक असून रोटरी संस्थेचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर राहिले आहेत. त्यांनी बर्लिन विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. तसेच सोलापूर जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीत ते संचालक म्हणून निवडून आलेले आहेत.

जिल्हा उपाध्यक्ष ॲड. केदार पाटील (शेळगीकर) हे विधीज्ञ असून प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांचा पेट्रोल पंपाचा व्यवसाय आहे. पाटील परिवार वीरशैव समाजातील पंचाचार्य जगद्गुरूंच्या काशी पीठ जंगमवाडी मठ, श्रीशैल पीठ आणि उज्जैन पीठ या तीन पीठांचे विश्वस्त सदस्य आहेत.

जिल्हा मंत्री जयदेव सुरवसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून त्यांनी यापूर्वी धर्मप्रसार जिल्हा प्रमुख, बजरंग दल शहर संयोजक, गोरक्षा जिल्हा प्रमुख, जिल्हा उपाध्यक्ष, शहर मंत्री आणि विभाग मंत्री अशी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow