शौर्य दिनानिमित्त विहिंपतर्फे मंदिरांमध्ये महाआरती
शौर्य दिनानिमित्त विहिंपतर्फे मंदिरांमध्ये महाआरती
आज गीता जयंती. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी ढाँंचा भुईसपाट झाला. तमाम हिंदूंच्या शौर्याचा दिवस. त्या स्वाभिमानाचा जागर करणेसाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शौर्य दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरांमध्ये सामूहिक आरती आणि अन्य उपक्रमांचे आयोजन विहिंपतर्फे करण्यात आले होते. "सौगंध राम की खाते है, मंदिर भव्य बनायेंगे" हा संकल्प अयोध्या रामजन्मभूमीच्या ठिकाणी केला होता. अखेर मंदिर वही बनायेंगे, मंदिर भव्य बनायेंगे। याची देही, याची डोळा हा संकल्प 22 जानेवारी 2024 रोजी पूर्णत्वास नेला
: विजयकुमार पिसे, विभाग सहमंत्री विहिंप, प.महाराष्ट्र प्रांत.
गीता जयंती, मोक्षदा एकादशीच्या दिवशी 1992 मध्ये साडेपाचशे वर्षांचा बाबरी ढाँचा हिंदू जागरणामुळे भुईसपाट झाला. तिथेच तात्काळ रामलल्लाचे छोटे मंदिरही उभे राहिले. हिंदूंच्या स्वाभिमानाचा हा दिवस. शौर्य,पराक़्रमाचा दिवस. विश्व हिंदू परिषदेने शौर्य दिनाच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे माधव प्रखंडामध्ये सोमवारी विविध मंदिरांमध्ये महाआरती पार पडली.
महाआरतीचे आयोजन प्रखंड मंत्री कृष्णा देशपांडे, बजरंग दल सुरक्षा प्रमुख राजू मनसावाले, देविदास सत्तारवाले, दिगंबर बडूरवाले व विकास कुलकर्णी यांनी केले.महाआरतीसाठी विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे, जिल्हा मंत्री संजयकुमार जमादार यांचे मार्गदर्शन लाभले व सहसंयोजक अभय कुलथे, प्रवीण जिल्हा यांची उपस्थिती होती. महाआरतीसाठी मंदिराचे पुजारी सागर म्हेत्रे, हरीश मैत्राणी यांनी परिश्रम घेतले.
माधव प्रखंडातील हनुमान मंदिर, स्वागत नगर, केंगनाळकर शाळेजवळ सायंकाळी 6. 30 वाजता हनुमान मंदिर, पारशी विहीरजवळ सायंकाळी 7. 15 वाजता आणि हनुमान मंदिर, डॉ. भांगे दवाखान्याजवळ रात्री 8.30 वा. महाआरती पार पडली. यावेळी धर्मप्रेमी माताभगिनी, दुर्गा आणि बजरंगी प्रचंड संख्येने उपस्थित होते. विश्व हिंदू परिषदेच्या शौर्य दिनाच्या निमित्ताने सर्व प्रखंडात महाआरती करण्याचे आवाहन जिल्हा मंत्री संजय जमादार आणि जिल्हा अध्यक्ष हभप अभिमन्यू डोंगरे यांनी केले होतेे.
What's Your Reaction?