सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या एकषष्ठीनिमित्त तुलाभाराचा अपूर्व सोहळा
सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या एकषष्ठीनिमित्त तुलाभाराचा अपूर्व सोहळा
श्रीक्षेत्र औसा येथील सद्गुरू वीरनाथ-मल्लनाथ महाराज संस्थानच्या परंपरेचे पाचवे पीठाधीश सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या एकषष्ठीनिमित्त आणि सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या २५ व्या पुण्यस्मरण महोत्सवानिमित्त तुलाभार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अपूर्व सोहळ्यास मोठ्या संख्येने शिष्य भाविक,भक्त मंडळी उपस्थित होती.
अॅड.शाम कुलकर्णी यांच्या पुढाकारातून अनेक शिष्य आणि त्यांच्या परिवाराच्या उत्कट भक्तिभावातून हा सोहळा मंगलमय वातावरणात झाला.सोहळ्याची सुरुवात सद्गुरू गुरु बाबा महाराज आणि सद्गुरू गहिनीनाथ महाराज यांच्या पाद्यपूजनाने झाली. यावेळी विविध शिष्य परिवारांनी धान्य, पेढे, वस्त्र, साखर, खडीसाखर अशा विविध वस्तूंचा तुलाभार भक्तिभावाने अर्पण केला. गोपाळपूर परिसरात आयोजित या सोहळ्यासाठी लातूर, चाकूर, उमरगा, नांदेडसह अनेक ठिकाणांहून हजारो भाविकांनी हजेरी लावली होती.
गुरुभक्तीने न्हाऊन निघालेला हा तुलाभार सोहळा औसा येथील अध्यात्मिक परंपरेच्या वैभवात भर घालणारा ठरला.भाविकांच्या भक्तीतून सोहळ्याला आध्यात्मिक तेजप्रकाश रतन कोहाळे (हरेगाव) यांनी साखरपुडा तुला, जगन्नाथ प्रल्हाद माने (तुरोरी) यांनी खडीसाखर तुला, राजश्री नरेंद्र पाटील (लातूर) यांनी सप्तधान्य तुला, गंगाबाई शेषराव पाटील व नितीन शेटे यांनी साखर तुला, बसपुरे (लातूर), श्री गोविंदराव माकने (चाकूर) यांनी पाद्यपूजन व तुलाभार, मेघा माकणीकर (बोरफळ) यांनी गहिनीनाथ महाराजांचे तुलाभार, लताबाई शिवाजीराव मोरे (उमरगा) यांनी गुरुबाबा व गहिनीनाथ महाराजांचे तुलाभार, शिवराज होटाळकर व संध्या होटाळकर (नायगाव, नांदेड) यांनी पाद्यपूजन व तुला, छबुबाई नारायणराव सूर्यवंशी (मुगळी) यांनी ६१प्रित्यर्थ पेढ्यांची तुला केली. शिष्य परिवाराच्या निष्ठेने आणि सद्गुरू गादी प्रती दाखवलेल्या समर्पणाने या उत्सवाला एक अद्वितीय अध्यात्मिक तेज प्राप्त झाले आणि सोहळा विशेष गाजला.
What's Your Reaction?