हा तर मायक्रोप्लॅनचा चमत्कार
भाजपाने 284 बूथवर 100 वाढीव मतंं खेचली, कुणी काही म्हणो, इव्हीएमबद्दल

सोलापूर : जितक्या तपशीलात (खोलात) जाल, तितकी यशाची खाोली वाढते. नुसत्याच शंकाच व्यक्त केल्या तर डोक्यावरील केस उपटल्याशिवाय राहात नाही. तशी अवस्था काही जण निर्माण करीत आहेत. पण भाजपाच्या यशाचे मूल्यमापन पाहिले तर हा मायक्रोप्लॅनचा चमत्कार नक्कीच आहे. शहरातील 978 बूथपैकी 125 (दक्षिण सोलापूर), 90 (सोलापूर मध्य) आणि 69 (सोलापूर उत्तर) आणि 40 गावं (अक्कलकोट) बूथवर प्रत्येकी 100 वाढीव बोनस मतांचे प्रमाण मायक्रोप्लॅन योजनेतून भाजपाने राबविले, हे यशाचे इंगित आहे. त्यामुळे इव्हीएम घोटाळ्याबद्दल कुणी काही म्हणो....
लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश आणि त्या पहिल्या दिवसापासूनची खबरदारी भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी घेतली. महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव, छत्तीसगढचे संघटनमंत्री अजय जम्बवाल आणि सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक रघुनाथ कुलकर्णी यांनी मायक्रोप्लॅनबाबत कुठेही ढिलाई होऊ दिली नाही. मोदी यांची सभा 12 नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री या 284 विशेष बूथचा आढावा घेतला. आणि पुढील आठवडाभर तिथे अधिक फोकस केला. यासाठी काही कार्यकर्त्यांची नियुक्ती केली. त्याचा अनुभव असा आहे की, या सर्व बूथवर भाजपा उमेदवार अनुक्रमे सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, विजयकुमार देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी यांचे बोनस मताधिक्य वाढले. महत्वाची नोंद म्हणजे गत लोकसभा निवडणुकीत या बूथवर भाजपाला अपेक्षित मते मिळालेली नाहीत, तसेच हे बूथ भाजपानुकूल आहेत, असे नाहीत.
दक्षिण सोलापुरातील मंद्रुप, कंदलगाव, उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे, तिर्हेे, प्रतापनगर, सोरेगाव, देगाव, कुमठे, सलगर वस्ती, नई जिंदगी आणि विजयपूर नाका झोपडपट्टी तसेच सोलापूर शहर मध्य भागात भारतरत्न इंदिरा नगर, आदर्श नगर, कुमठा नाका, कुर्बान हुसेन नगर, पंचशील नगर, तेलंगी पाच्छा पेठ, जेलरोड, सिध्देश्वर पेठ, शास्त्रीनगर, मौलाली चौक, कोनापुरे चाळ, लष्कर, मोदी, गरीबी हटाव झोपटपट्टी, न्यू तिर्हेगाव फॉरेस्ट सलगर वस्ती, रामवाडी, लिमयेवाडी आणि शहर उत्तर मतदारसंघातील कोंडी, केगाव, बाळे, शेळगी, मित्रनगर, बुधवार पेठ, हनुमान नगर, मुकुंद नगर, मराठा वस्ती या भागांचा समावेश आहे. याशिवाय काही संवेदनशील बूथ आहेत, तिथे विशेष खबरदारी घेतली. मतदान प्रक्रियेत गडबडी होणार नाहीत, ही त्यामागची भूमिका होती.
*संपूर्ण शहरासाठी विक्रम देशमुख, रूद्रेश बोरामणी अध्यक्ष नरेंद्र काळे आणि मतदारसंघ निहाय मनीष देशमुख, डॉ.शिवराज सरतापे, दत्ता गणपा, शिवानंद पाटील, सुनील गौडगाव, बजरंग कुलकर्णी, नागेश सरगम, संजय कोळी, प्रसाद कुलकर्णी, राजू पाटील, देविदास चेळेकर, बाबुराव जमादार यांनी ही मोहीम फत्ते केली.* हि बोनस मते विजयाशिवाय मताधिक्य वाढविण्याचे तंत्र ठरले आहे.
*अक्कलकोटातही मायक्रोप्लॅन*
अक्कलकोट मतदारसंघातील 390 बूथपैकी 40 गावांमध्येही मायक्रोप्लॅन योजना झाली. सातनदुधनी, इब्राहिमपूर, सिन्नूर, गुरववाडी, मराठवाडी, चिंचोळी, चपळगाव, चपळगाव वाडी, बर्हाणपूर, तसेच शहरात माणिक पेठ, नाईकवाडी गल्ली, म्हेत्रे वस्ती, न.पा.शाळा नं 1 सह अन्य भागात *तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, सिध्देश्वर कल्याणशेट्टी, दयानंद बम्मनगी, प्रदीप पाटील यांनी मायक्रोप्लॅन योजना यशस्वी केली.*
What's Your Reaction?






