गुरुबाबा महाराज, रामकृष्ण महाराज उत्सवाची सांगता
निलंगा बाराव येथे गोपाळकाला, सांगता

निलंगा : सद्गुरु गुरुबाबा महाराज आणि रामकृष्ण महाराज यांच्या वार्षिक उत्सवाची निलंगात
पालखी प्रदक्षिणा व श्रीक्षेत्र बारव येथे दहीहंडी गोपाळकाला फोडून उत्साहात सांगता झाली.
श्री गुरुबाबा महाराज व औसेकर महाराजांचे मार्गदर्शनाखाली
उत्सवास हजारो भावविकांची उपस्थिती होती. ज्ञानोबा तुकारामाच्या, सद्गुरूंच्या आणि विठ्ठलाच्या नाम गजराने बारव क्षेत्र परिसर दुमदुमून गेला होता. श्रीरंग महाराज व ज्ञानराज महाराज औसेकर यांच्या सहभागात कीर्तन सेवा गुरु बाबा रामकृष्ण महाराज यांच्या समाधी समोर संपन्न झाली.
निलंग्याच्या बारव क्षेत्री निलंगा व पंचक्रोशीतील सद्भक्त शिष्य आपली सेवा विरनाथ महाराज चरित्र ग्रंथाचे पारायण कडाक्याच्या थंडीचे दिवस अस़ूनही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उत्सवात जवळपास 30 ते 40 गावातून ज्ञानोबा तुकाराम सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज आणि रामकृष्ण गुरुबाबा महाराज यांच्या नावाचा जयघोष असतो. सलग पाच दिवस निलंग्यात भक्ती उत्साहाचे वातावरण असते.
*गुरु म्हणजे शिष्य निर्माण करणारी फॅक्टरी नाही: गुरुबाबा महाराज*
या सोहळ्याप्रसंगी भाविकांना
ताबडतोब उपदेश घेण्याची घाई असते. परंतु गुरु म्हणजे काही शिष्य निर्माण करणारी फॅक्टरी नाही त्यासाठी आधी गळ्यात माळ, पंढरीची वारी, ज्ञानेश्वरीचे पारायण गाथा वाचन आणि एकादशी या व्रता
मधे आपल्या जीवनाला आणून नंतरच समजून पारखून निर्धार करून गुरु करून घ्यावा व गुरु कडून गुरुमंत्र उपदेश घ्यावा असे प्रतिपादन नाथ संस्थानचे
पीठाधिपती सद्गुरु गुरूबाबा महाराज औसेकर यांनी केले.
गुरुंनी सांगितलेला उपदेश व शिकवण जीवनभर आचरणात आणण्याची तयारी घेऊन उपदेश घ्यावा उपदेशानंतर मनुष्य जिवाच्या
जीवनामध्ये परिवर्तन घडलेच पाहिजे असे श्री गुरुबाबा महाराज म्हणाले. तसेच चक्रीभजनाची सेवा व नगर प्रदक्षिणा पार पडली.
दर्शनासाठी दुतर्फा गर्दी होती.
What's Your Reaction?






