भाजपा पुन्हा जनतेच्या मनात!
महाराष्ट्राच्या नीती, गती, प्रगतीसाठी देवाभाऊ यांच्या तब्बल 43 सभा;नगरपालिका, नगर पंचायतींसाठी आज मतदान, कार्यकर्त्यांसाठी निवडणूक; अनगर,राज्यातील एकमेव बिनविरोध,पण आता स्टेे,स्थानिक भाजपा नेत्यांनाही बसली चपराक।
(विजयकुमार पिसे)
गतवर्षी विधानसभेच्या निवडणुकीत नंबर वन ठरलेल्या भाजपाची चढाई आता निमशहरी भागात होत असून नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या पहिल्या टप्प्यासाठी आज 2 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. "भाजपा पुन्हा जनतेच्या मनात" असाच निकाल यावेळीही अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवड्यात तब्बल 43 जाहीर सभा घेऊन चांदा ते बांद्यापर्यंत महाराष्ट्रातील कानाकोपरा पिंजून काढला आहे. केवळ कार्यकर्त्यांसाठीच ही निवडणूक त्यामुळे गेले पंधरा दिवस तमाम पक्षांचे नेते गावपातळीपर्यंत पायधूळ झाडून आले आहेत. महायुतीत मिठाचा खडा पडला तरी निवडणूक़ निकालानंतर 2029 पर्यंत पुन्हा गुण्यागोविंदाने नांदणे हाच संकल्प फडणवीस,शिंदे,पवार या त्रिकुटांचा आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवडाभरात संपूर्ण राज्यात झंझावाती प्रचार रॅली घेतल्या. आज शेवटच्या दिवशी ते संभाजीनगरात दिसले, तेव्हाही चॅनलच्या कॅमेर्यासमोर फ्रेश मूडमध्ये दिसले. एकनाथ शिंदेंबरोबर एका हॉटेलात उतरूनही दोघांमध्ये अबोला, चॅनलवाल्यांच्या प्रश्नावर त्यांनी चॅनलवालेंनाच क्लीन बोल्ड केले. म्हणाले, चालवा दिवसभर ही
च बातमी! महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण अहोरात्र राबण्याचा प्रण। बोलून नव्हे तर त्यांनी कृतीने अधोेरेखित केला. त्यामुळे भाजपा पुन्हा जनतेच्या मनात, याचे प्रतिबिंब उमटेल. देवाभाउंच्या अथक प्रचार सभा, दौरे आणि पुन्हा ते दिसले फ्रेश मूडमध्ये. त्यामुळे नीती,गती,प्रगतीत महाराष्ट्र नंबर वन्,॥ भाजपा नंबर वन्॥। असाच कौल निमशहरी भागातूनही उमटेल. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामनात देखील हेच चित्र आहे.
*अनगरचा फुटला फुगा..*
केव्हा तरी फुगा फुटतोच,असे विधान अजीतदादा पवार यांनी अनगरकर पाटलांचे बाळराजे यांच्या कॉलरटाईट आव्हानाला उत्तर देताना केले होते. अनगरकराना आठवड्यातच प्रत्युत्तर मिळाले. अनगर बिनविरोध जल्लोषाचा फुगा दणकून फुटला, हे या संपूर्ण निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य. संपूर्ण महाराष्ट्रात अनगरची निवडणूक़ बिनविरोध करून दाखवली, उज्वला थिटे यांची याचिका फेटाळली तरी तांत्रिक कारणामुळे निवडणूक़ आयोगाने येत्या 20 डिसेंबरपर्यंत अनगरची निवडणूक़ रहित केली आहे. अनगरकर आणि त्यांच्या पाठिशी धाव घेणारे भाजपाचे स्थानिक नेते यांनाही या "स्टे"मुळे चपराक बसली आहे.
What's Your Reaction?