राष्ट्रीय हातमाग दिवस दिनानिमित्त हातमाग करणाऱ्या प्रतिकात्मक पुतळ्यास अभिवादन

राष्ट्रीय हातमाग दिवस दिनानिमित्त हातमाग करणाऱ्या प्रतिकात्मक पुतळ्यास अभिवादन

Aug 8, 2024 - 18:40
 0  40
राष्ट्रीय हातमाग दिवस दिनानिमित्त हातमाग करणाऱ्या प्रतिकात्मक पुतळ्यास अभिवादन
राष्ट्रीय हातमाग दिवस दिनानिमित्त हातमाग करणाऱ्या प्रतिकात्मक पुतळ्यास अभिवादन
 सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 7 ऑगस्ट यंत्रमाग दिनानिमित्त विणकर बागेतील हातमाग काम करणाऱ्या प्रतीकात्मक पुतळ्यास महापालिकेच्या वतीने उपायुक्त आशिष लोकरे   यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत- पाटील,माजी विरोधी पक्षनेते  महेश कोठे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी, नागेश वल्याळ, सायक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी नितीन साके, इंदिरा कुडक्याल, रामचंद्र जन्नू, काृँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, पद्मशाली युवक संघटना अध्यक्ष शेखर कटकम, राकेश पुंजाल, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सरचिटणीस दशरथ गोप, यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, हरिओम विणकर बाग बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष गणेश सिध्दम राकेश पुंजाल, रामगोपाल म्याकल, सिध्दारूढ जेवरगी, सिध्दारूढ निंबाळे, विजय झुजा, विजय निली, वासुदेव अडकी, अ‍ॅड. अनिल वासम, नवनाथ साका, गणेश बोध्दूल, नागेश बंडी, श्रीनिवास दासरी, गणेश गुज्जा आदी मान्यवर उपस्थित होते. या दिनांचे औचित्य साधून कांही विणकर बांधवांंचा आणि विणकर क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्यांचा सत्कार करण्यात आला. 
वॉल हॅगिंचे नॅशनल ऑवार्ड राजेंद्र अंकम, हटगार कोष्टी सामाजाचे प्रदेश महिला अध्यक्ष सौ. वंदना शरणबसप्पा अष्टगी अक्कलकोट, सौ. विजयालक्ष्मी हुलमनी, वॉल हॅगिंचे प्रविण फलमारी, श्रीनिवास अनंतुल, अंबादास करली, लक्ष्मण गणपा, दत्तात्रय जल्ला आदींचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी मनपाचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी आपल्या मनोगतात विणकर समाजाप्रति अनेक योजनांची माहिती सांगतली. स्वातंत्र्य लढ्यातील स्वदेशी चळवळ या दिवशी झाली त्याची उदारणे देवून हातमाग व्यवसाय अत्यंत गरज असल्याचे सांगितले. हातमाग व्यवसायाचे बापू गेनू हे विणकर समाजाचे चळवळ सुरू केली,  पुढील वर्षी विणकर सप्ताह करण्यासाठी आपण प्रयत्न करू अस आश्‍वसन दिले. 
यावेळी महेश कोठे, नरसय्या आडम मास्तर यांनी विणकर समाजाला शुभेच्छा दिल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow