पद्मशाली सखी संघम तर्फे राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विणकर पुतळ्यास अभिवादन...
पद्मशाली सखी संघम तर्फे राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विणकर पुतळ्यास अभिवादन...
सोलापूर : ७ ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्त सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीने विणकर बागेतील बुधवारी सकाळी विणकर पुतळ्यास अभिवादन करण्यात आले आहे. त्यानंतर सिध्देश्वर पेठेतील श्री मार्कंडेय मंदिरात श्रींचे आरती करण्यात आले. याप्रसंगी पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम, सल्लागार सीमा यलगुलवार, समन्वयिका कला चन्नापट्टण, गीता भूदत्त, कार्याध्यक्षा अन्नपूर्णा सोमा, खजिनदार आरती बुधाराम, कार्यकारिणी सदस्या ॲड. मेघना मलपेद्दी, हेमा मैलारी, अंबिका वल्लाल, सोनाली तुम्मा आदी उपस्थित होत्या.
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त बोलताना अध्यक्ष मेघा इट्टम म्हणाल्या, प्रत्येक भारतीयांने महिन्यातून किमान ४ - ५ वेळा खादी कपडे परिधान करावेत. यामुळे हातमाग व्यवसाय जिवंत राहून विणकर बांधवांना रोजगार उपलब्ध होउ शकतो. सल्लागार सीमा यलगुलवार म्हणाल्या, एखादे वस्त्र विणताना धाग्यांच्या गुंफणीतून त्यात अनेक भावना विणल्या जातात. हातमाग वस्त्रकला ही एक प्राचीन अभिजात कलाकृती आहे आणि आज सोलापूर, तेलंगणा, आंध्रप्रदेशसह आदी ठिकाणी याचे जतनही केले जात आहे. विणकरांच्या कष्टाचे, त्यांच्या समर्पणाचे मोल राखण्यासाठी आणि ही परंपरा जपण्यासाठी हातमाग व्यवसाय जिवंत राहण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने मदत करावी.
What's Your Reaction?