'ई बसेसना आता दिवाळीचा मुहूर्त; २ महिन्यापूर्वी बस आल्या...पण

चार्जिंग स्टेशन आणि बस डेपोची कामे वेगाने पूर्ण करण्याचे महापौरांचे निर्देश; परिवहन विभागाची आढावा बैठक

Oct 15, 2026 - 00:42
 0  4
'ई बसेसना आता दिवाळीचा मुहूर्त; २ महिन्यापूर्वी बस आल्या...पण

सोलापूर : सोलापूरमधील  सार्वजनिक परिवहन अंतर्गत नवीन  20 ई बस 2 महिन्या पूर्वीच दाखल झाल्या. तेव्हापासून तारीख पे तारीख मुहूर्त जाहीर होत असे.
   दरम्यान महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी परिवहन विभागाची आढावा बैठक घेतली. ई-बस चार्जिंग स्टेशन, बुधवार पेठ येथील ई-बस डेपो, बस थांब्यांची उभारणी याविषयी चर्चा झाली. राजेंद्र चौक बस डेपो, सात रस्ता बस डेपो या ठिकाणी अजून चार्जिंग स्टेशन उभे झाले नाही. हे निदर्शनास  आले.
  या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र  काळे,  सभापती रंजिता चाकोते, आयुक्त डॉ.ओंबासे, 
 श्रीकांचना यन्नम, नगरसेवक गौतम सारिका आकुलवार, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, नगर अभियंता नीलकंठ मठपती आणि अग्निशामक विभागाचे प्रमुख राकेश साळुंखे, जेबीएम कंपनीचे प्रदीप उंबरकर, श्री ध्रुव, परिवहन व्यवस्थापक इरण्णा वन्यालोल्लू, कनिष्ठअभियंता यंकटेश गुडसेलू उपस्थित होते.
   बैठकीत जेबीएम कंपनीमार्फत ई-बस चार्जिंग स्टेशनची उभारणी तातडीने सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. कंपनीकडून पाच चार्जर उपलब्ध करून देण्यात आले असून, चार्जिंग स्टेशनचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. बुधवार पेठ ई-बस डेपोतील प्रलंबित सिव्हिल कामे सुरू करण्यासाठी लेबर मक्ता निश्चित करून येत्या ८-१० दिवसात कंपाउंड वॉल काम पूर्ण करण्याचे सांगितले.
     शहरातील ई-बस सेवा अधिक कार्यक्षम करणे, दिवाळीच्या आधी ई बसेस शहरात सुरू करण्यात येईल,असे जाहीर केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow