मोची समाजाचा काँग्रेसकडून घात

५ नगरसेवक व पदाधिकारी भाजपात; गत ७ वर्षाच्या प्रयत्नास यश

Nov 9, 2024 - 19:59
Nov 9, 2024 - 20:10
 0  395
मोची समाजाचा काँग्रेसकडून घात

(विजयकुमार पिसे)

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून दिलेल्या मोची समाजाची दखल घेतली जात नाही. काँग्रेसकडून नेहमीच मोची समाजाचा वापर व घात होतो. याचा बदला म्हणून सोलापुरातील मोची समाजाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपात प्रवेश केला. मोची समाजाच्या या धक्कादायक निर्णयामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. 

 सोलापुरातील तेलुगू भाषिक मोची समाज मतदारसंघात निर्णायक असून १९९५ पासून या समाजाची फसवणूक होते, असा अनुभव आहे. आमदारकीची उमेदवारी मिळावी म्हणून मोची समाजाने अपेक्षा ठेवून होता. मोची समाज बांधव संधीची वाट पाहत होता. अखेर काँग्रेसला हात दाखवत भाजपामध्ये प्रवेश केला. मोची समाजाचे अध्यक्ष तथा माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे तसेच नगरसेवक जेम्स जंगम, वैष्णवी व बाबा करगुळे, सिद्राम अट्टेलूर, सरस्वती व नागनाथ कासलोलकर यांच्यासह पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भंडारा उधळला. 

     गत सात वर्षापासून लष्कर, बापूजी नगर भागातील मोची समाज रा.स्व.संघ, विहिंपच्या कार्यरचनेतून भाजपाच्या संपर्कात होता. २०१७ च्या मनपा निवडणुकीत उमेदवारीची मागणीही केली, पण तोपर्यंत उशीर झाला, भाजपाचे उमेदवार जाहीर झाले होते. मात्र संघ म्हणून आम्ही संपर्क कायम ठेवला. त्यामुळे २०१९ व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या समाजाकडून भाजपाला मुक्त रसद मिळाली. तत्पूर्वी विजयपुराचे भाजप खा. रमेश जिगजिणगी व माजी उपमुख्यमंत्री गोविंद करजोळ या दोन नेत्यांंच्या भेटीही झाल्या होत्या. तसेच खा. अशोक चव्हाण यांचाही नंतर संपर्क झाला. देवेंद्र कोठे यांच्या भाजपा प्रवेशानंतर मोची समाजाने पक्का निर्धार क़ेला. त्यासाठी करगुळे व भंडारे यांनी काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागणी केली. अपेक्षेप्रमाणे त्यांना नाकारले. मोची समाज बहुसंख्येने असूनही शिंदे परिवाराने त्यांना झिडकारले, हे शल्य होतेच. १५ दिवसांपूर्वी करगुळे यांनी पुन्हा आमचेशी संपर्क केला. आणि आज मोची बांधवांनी मोट आवळली, आणि भाजपा प्रवेशाचा निश्चय केला.

१९९५ मध्ये पूर्वीचा शहर दक्षिण सोलापूर मतदार काँग्रेसला सेफ करणेसाठी या समाजाचे जेष्ठ नेते सुंदरलाल कमलापुरे यांना संधी देण्याऐवजी त्यांना उत्तर सोलापूर राखीव मतदारसंघात उमेदवारी दिली. उत्तर सोलापूर हा शिंदे यांचा मतदारसंघ, परंतु कमलापुरे तिथे उपरा उमेदवार होते. इकडे शहर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसने प्रकाश यलगुलवार यांना उमेदवारी दिली. यात दोन्ही जागा काँग्रेसला गमवाव्या लागल्या. आता स्व. कमलापुरे यांचा बदला घेण्याची ही संधी मोची समाज बांधव सोडणार नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow