नवरोबाचं चक्क गाढवासोबत लगीन, म्हणे बायको नांदायलाच नाही येत

ऐकावं ते नवलच. हल्ली लग्नाळूंची खूप चर्चा होते, मुलगी मिळत नाही, देत नाही, नकार मिळतो. पण इथं भलतंच...

Oct 6, 2026 - 12:49
 0  5
नवरोबाचं चक्क गाढवासोबत लगीन, म्हणे बायको नांदायलाच नाही येत

सोलापूर | एका संसारी नवरोबानं बायको नांदायला येत नसल्याचे कारण पुढे करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर चौकात जाहीरपणे चक्क गाढवासोबत लग्न करण्याचा धक्कादायक प्रकार पहायला मिळाला. इथं हा नवरोबा आंदोलनाला बसलाय, त्यावर म्हणे यामध्ये प्रशासनानं लक्ष घालावं. म्हणजे संसार विस्कटला तर यामध्ये सरकारनंच लक्ष घालावं की काय? अजब गजब दुनिया..
   अशा नाकर्त्या नवरोबाचं नाव आहे दीपक सूर्यवंशी. 52 वर्षीय दीपकचं 16 वर्षापूर्वी विवाह झाला असून त्याला एक मुलगी देखील आहे. मात्र घरगुती कारणावरून बायको गेली माहेरी. ती काही परतीचं नाव घेईना. उलट नवरोबा दीपकची सासरी धुलाई झाली. यास कारणीभूत मेव्हणा. तो धक्काबुक्की करतो, मारहाण करतो,  शिव्याशाप देतो. अशीही दीपकची तक्रार. विशेष म्हणजे या भानगडीत एका पुढार्‍याचा हात आहे, अशी पुस्ती त्यानं जोडली. त्यामुळे या छळास कंटाळून दीपकने पोलिसात दाद मागितली. पण ना फिर्याद, ना एफआयआर. म्हणून गत पंधरवड्यापासून आंदोलनाला बसला याकडे लक्ष वेधण्यासाठी त्याने आज अचाट पराक्रम केला. 
   वर्तमानात तरुण मुलांना लग्नासाठी मुली भेटत नाहीत. मग माझ्यासारख्या पन्नाशी पार माणसाला कोण मुलगी देणार? हा त्याचा बाळबोध प्रश्‍न. माहेरी मेव्हणा वैभवात राहतो, तसं वैभव मलाही मिळावं, ही बायकोची इच्छा. माझी विच्छा पुरी करा, अर्थात असं वैभव दीपकनंही दिलं पाहिजे, ही माहेरी रूसून गेलेल्या बायकोची अपेक्षा. तिला नवर्‍याचा बोध व्हावा आणि ती सासरी परतावी. तसेच सुखी संसारात हस्तक्षेप करणार्‍या मेव्हण्यावर पोलीस कारवाई व्हावी, म्हणून आधी पोलिसात हेलपाटे नंतर आंदोलन आणि आता चक्क नवरोबाच चक्क गाढव झाला आहे. या अचाट आंदोलनाची दखल प्रशासन कितपत घेईल काय?

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow