मेघा रे मेघा रे... परत फिरा रे रूसलेला मेघ अखेर बरसला...
सहज भाव प्रकटल्या.. कित्ती दिवसांनी पाउस पाहिला. आणि पुढे शब्द फुटले.. मेघा रे मेघा रे... परत फिरा रे..
सोलापूर | शनिवारी रात्री सव्वा दहाचा सुमार. अचानक पाऊस कोसळू लागला. एरवी पाऊस कधीचा येतो आणि आला, म्हणे पर्यंत माघारी फिरतो. पावसासाठी आसुलेल्यांची नेहमीचीच फसवणूक... पण मेघ बरसतच राहिला. अर्धा तासानंतर मेघ गर्जनेचा गजरही सुरू झाला. मग खात्री पटली. आता तो नाही माघारणार...
गदिमांचे गीत आणि लता दिदींचे मनाला भावणारे स्वर
या चिमण्यांनो परत फिरा रे.. घराकडे अपुल्या।
तद्वत बरसणारा.. मेघा रे मेघा रे...परत फिरा रे।
नको रुसवा, नको आता खंड। होउ दे अखंड धारा
धरणी माता आनंदली, सुखावली, असाच खळाळून वाहात रहा.. म्हणजे धरणी मातेला भरलेली ओटी फुलत राहील
श्रावणात हमखास बरसणारा मेघ यंदा रूसला. यंदा श्रावणातील अनेक सण कोरडेेच गेले. गोकुळाष्टमीनंतर येईल म्हणून चातकासारखी वाट पाहिली. बाप्पा वाजत गाजत आला. पण मेघाची हजेरी लागली नाही. म्हणून धुक धुक लागून राहिली होती. तीन दिवस माहेरवाशिण आलेली गौरी.. शनिवारी सायंकाळनंतर माघारली. आणि दोन घटकांनी रात्री मेघ अखेर बरसला...
आता मात्र परत फिरू नको, इतकीच आर्त विनवणी श्री गणराया चरणी।
What's Your Reaction?