भाजपाचा सुपर पॉवर रोड शो, पवन कल्याणसाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी

भाजपा उमेदवार "पावन"; देशमुख, देवेंद्रदादा, सुभाषबापू यांचे होणार "कल्याण"

Nov 16, 2024 - 19:45
 0  795
भाजपाचा सुपर पॉवर रोड शो, पवन कल्याणसाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी

(विजयकुमार पिसे)

सोलापूर : तेलुगू सुपर पॉवर स्टार पवन कल्याणचा रोड शो हायव्होल्टेज सुपर पॉवर ठरला. भाजपा उमेदवार विजयकुमार देशमुख, देवेंद्र कोठे आणि सुभाषबापू देशमुख यांच्या प्रचारार्थ आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या दर्शनाने पब्लीक बेहद्द खूष झाली. दुपारी तीन पासूनच विडी घरकुल परिसरातील सर्व रस्ते गर्दीने खचाखच भरले होते. सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी शनिवारी सायंकाळी रोड शो चे आयोजन केले होते. पवन कल्याण यांचा रोड प्रत्यक्षात रात्री 8 वाजता सुरू झाला. पवन कल्याण यांना पाहण्यासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती. 

 आंध्र प्रदेशातील जनसेना पक्षाचे संस्थापक तथा उपमुख्यमंत्री यांच्या रोड शो साठी त्यांच्या चाहत्यांना तब्बल चार तास प्रतीक्षा करावी लागली. जुना विडी घरकुल येथील आदिशक्ती चौक़, संभाजीराव शिंदे प्रशाला, पिंडीपोल हॉस्पीटल, लक्ष्मी चौक, सागर चौक, वसुंधरा सोसायटी, गोंधळी वस्ती, 256 गाळा, शांती चौक़, माकर्र्डेय रुग्णालय, दाजी पेठ, दत्तनगर, स्वा. सावरकर पुतळा, वालचंद कॉलेज, सत्तर फूट रोड, माधव नगर आणि नीलम नगर असा रोड शो चा मार्ग होता. त्यामुळे त्यांच्या प्रतीक्षेत या परिसरातील सर्व रस्त्यांवरील गर्दी ओव्हरफुल्ल होती. आपल्या भागात पवन कल्याण येउ शकणार नाहीत, हा अंदाज घेवून त्यांच्या चाहत्यांनी शहरातील मध्यवर्ती भागात हजेरी लावून आणि जेसीबीने फुले उधळून आपल्या लाडक्या सुपर पॉवर स्टार हिरोचे स्वागत केले. शिवाय मोबाईरूमध्ये आपल्या चाहत्याची छबी टिपण्यासाठी अनेकांचे मोबाईल ऑन होते. 23 तारखेच्या निवडणूक़ निकालाआधीचा ट्रेलर आज रोड शो च्या निमित्ताने पाहायला मिळाला.

भाजपाचे उमेदवार विजयकुमार देशमुख, देवेंद्र कोठे, सुभाष बापू देशमुख यांना विजयी करण्याचे आवाहन करीत हातात कमळ असलेले चित्र झळक़ावत कमळाला मतदान करा, असे आवर्जून सांगितले. 

शहर मध्य मतदारसंघात स्वागत....

*रात्री साडेनउच्या सुमारास शहर मध्य मतदार संघात अक्कलकोट रोड येथील पाणी टाकीजवळ सिने अभिनेते पवन कल्याण यांचे आगमन होताच उघड्या जीपमध्ये उभे राहिलेले अभिनेते पवन कल्याण आणि भाजपा महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जेसीबीने फुले उधळून स्वागत केले. जीपमध्ये उभे राहून त्यांनी नागरिकांना देवेंद्र कोठे यांना मतदान करून देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी जय श्रीराम, भारतमाता की जय, वंदे मातरम, जय मार्कंडेया अशा घोषणांनी रस्ते दुमदुमून गेले होते.*

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow