डिसेंबरमध्ये विमान टेक ऑफ, मुंबई नंतर गोवा येथेही सेवा
डिसेंबरमध्ये विमान टेक ऑफ, मुंबई नंतर गोवा येथेही सेवा

सोलापूर: सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार होणार असून येत्या २० डिसेंबरपासून होटगी रोड सोलापूर विमानतळावरून मुंबई आणि गोवासाठी थेट विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.
सोलापूरकरांची बहुप्रतीक्षित थेट विमानसेवा होटगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय ९१ एअरलाईन्स कडून हि सुविधा आहे. विमानसेवा २० डिसेंबर २०२४ पासून सुरु होणार असून मुंबई आणि गोवा यांसारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट उड्डाणे दिली जाणार आहेत.
ही सेवा सुरू करण्यासंबंधात मोदी व फडणवीस सरकारने भूमिका पार पडली. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते गेल्या महिन्यात या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
सोलापूर व मुंबईसाठी उड्डाण वेळापत्रकहि निश्चित केले आहे. हे वेलापत्रक पुढील प्रमाणे असेल. सोलापूर - मुंबई सकाळी ०९:४० वाजता (स. १०:४० मुंबई आगमन) तसेेच मुंबई - सोलापूर दुपारी १२:४५ वाजता (दु. ०१:४५ सोलापूर आगमन).
मुंबई विमानसेवे पाठोपाठ गोवासाठीहि उड्डाण वेळापत्रक तयार आहे. पण प्रारंभीच हि सेवा मुंबई _ सोलापुर अशीच राहिल. पुणे सेवा देखील सुरू होणार असून त्याचे नियोजन सुरू आहे.
सोलापूरच्या विकासासाठी एक मोलाची पायरी असून विकासाचा अडथळा पार होणार आहे.
भारतीय जनता पक्ष व भाजप खासदार व आमदारांनी केलेल्या वर्षानुवर्षे सुरु असलेल्या प्रयत्नांचे हे फळ आहे. या सेवेमुळे पर्यटन, उद्योगधंदे आणि व्यापारी क्षेत्राला नवे बळ मिळणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
What's Your Reaction?






