अखेर ठरलंच, येत्या रविवारी विमानसेवेचा शुभारंभ!!

मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

Sep 27, 2024 - 18:25
 0  326
अखेर ठरलंच, येत्या  रविवारी विमानसेवेचा शुभारंभ!!

सोलापूर : काल पावसामुळे रहित झालेला विमान सेवेचा शुभारंभ येत्या रविवारीच निश्चित झाला आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. आज भाजपा आमदारद्वय सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख उभयतांनी सोलापूर विमानतळास भेट देऊन पाहणी देखील केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ येत्या रविवारी होणार आहे, असे मंत्री मोहोळ यांनी सांगितले. 

सोलापूरच्या औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय प्रगतीसाठी कायमस्वरूपी विमानसेवेची आवश्यकता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे सोलापुरात विमानसेवा सुरू होत आहे. आता सोलापूरच्या विकासाला कोणीही रोखू शकत नाही. भाजप सोलापुरात विमानसेवा सुरु करु शकत नाही असे चॅलेंज काँग्रेसने दिले होते. पण ४० वर्षे सोलापुरात सत्ता गाजविणाऱ्यांना न जमलेले काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने करू दाखवले आहे, असे भाजपा अध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले.

दोन देशमुखांमध्ये कटुता दाखवून भाजपात गटबाजीचे चित्र रंगवणार्यांना चपराक बसली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीत अनेक इच्छुक दावे करताना आमच्यावर अन्याय झाला, सन्मान मिळत नाही, विश्वासात घेतले जात नाही, ही त्यांची हाकाटी. भाजपाचे माजी पदाधिकारी, आता जे कांग्रेसी आहेत, असंतोष निर्माण करण्यात त्यांचा यामध्ये मोठा रोल असल्याचे अनेक कार्यकर्ते सांगतात. दरम्यान आज विमानतळावर भेटीप्रसंगी भाजपा सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, रोहिणी तडवळकर, विशाल गायकवाड, रामप्पा चिवडशेट्टी, संजय कोली, प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow