"रेल्वेने घेतला सहा दिवसाचा मेगा ब्लॉक; इंटरसिटी एक्सप्रेस तीन दिवसांसाठी रद्द!

ट्रॉफिक ब्लॉकमुळे नांदेड-पनवेल एक्सप्रेस २९ जुलै ते १ ऑगस्ट २०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे."

Jul 28, 2024 - 05:44
 0  31
"रेल्वेने घेतला सहा दिवसाचा मेगा ब्लॉक; इंटरसिटी एक्सप्रेस तीन दिवसांसाठी रद्द!
ट्रॉफिक ब्लॉकमुळे नांदेड-पनवेल एक्सप्रेस २९ जुलै ते १ ऑगस्ट २०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे."

"सोलापूर : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड रेल्वे स्थानक, दौंड कार्ड लाईन, दौंड गुड्स यार्ड आणि दौंड ए कॅबिन दरम्यान नॉन इंटरलॉकिंग आणि ट्रॅफिक ब्लॉकच्या काम करिता गाड्या रद्द, मार्ग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक २७ जुलै ते १ ऑगस्ट २०२४ पर्यंत असणार आहे. याच काळात सोलापूर-पुणे, पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस तीन दिवसासाठी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, ट्रॉफिक ब्लॉकमुळे
* नांदेड-पनवेल एक्सप्रेस*
 २९ जुलै ते १ ऑगस्ट २०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे. 

पनवेल-नांदेड एक्सप्रेस
 दिनांक २९ जुलै ते ३१ जुलै २०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे. 

पुणे-सिकंदराबाद एक्सप्रेस
 २९, ३१ जुलै व १ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे. 

सिकंदराबाद-पुणे एक्सप्रेस 
२९ ते ३१ जुलै, पुणे-सोलापूर एक्सप्रेस २९ जुलै ते १ ऑगस्ट, सोलापूर-पुणे एक्सप्रेस २९ जुलै ते १ ऑगस्ट, पुणे-सोलापूर, सोलापूर-पुणे एक्सप्रेस, सोलापूर-दौंड मेमू, पुणे-हरंगुळ, हरंगुळ - पुणे, सोलापूर-पुणे डेमू, पुणे-सोलापूर डेमू रद्द करण्यात आली आहे. 

अमरावती-पुणे एक्सप्रेस 
२९ जुलै, सिकंदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ३० जुलै, लोकमान्य टिळक टर्मिनस-सिकंदराबाद एक्सप्रेस ३१ जुलै, पुणे-अमरावती, अमरावती-पुणे एक्सप्रेस १ ऑगस्ट २०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे."

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow