राजन पाटलांना "गिफ्ट", उमेश पाटील झाले "लेफ्ट"

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान!!

Sep 27, 2024 - 18:33
 0  246
राजन पाटलांना "गिफ्ट", उमेश पाटील झाले "लेफ्ट"

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या तोंडावर मोहोळ तालुक्यात घमासान सुरू झाले आहे. अनगरकर आणि नरखेडकर यांच्यातील वाद सर्वश्रुत असून प्रसंगी एकमेकांवर कमरेखाली वार करण्यात मागेपुढे होत नाहीत. आज राजन पाटील अनगरकर त्यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषद (राज्यमंत्री पदाचा दर्जा) अध्यक्षपदी निवड झाली. त्या सरशी इकडे नरखेडकर पाटील यांची निराशा झाली. त्यांनी तडकाफडकी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा देऊन टाकला. अजितदादा पवार यांनी अनगरकरांना "गिफ्ट" दिल्यामुळे नाईलाजाने उमेश पाटील पदावरून "लेफ्ट" झाले आहेत.

  गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजीत पवार जनसन्मान यात्रेनिमित्त मोहोळ दौऱ्यावर आले होते, तेव्हा उमेश पाटील यांनी मोहोळ बंद पुकारून एकप्रकारे अजीतदादांना आव्हान दिले होते. अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यावरून दोन पाटलांमध्ये, नव्या वादाला तोंड फुटले आहे. मोहोळ तालुक्यात अनेक गट नेहमीच अनगरकर विरोधात असतो. तरीही राजन पाटील अशा सर्व गटांवर मात करतात, हा अनुभव आहे. अप्पर तहसील कार्यालयाचा वाद, त्यामुळे राज्य शासनाने त्यास स्थगिती दिली. या उप्परही अनेकांचा विरुद्ध डावलून अनगरमध्येच अप्पर तहसील कार्यालय सुरू झाले. त्यामुळे ही धग आणखी भडकली. गेल्या आठवड्यात अजीतदादा पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे स्वागत मोहोळ बंद पुकारून करण्यात आले. याची दखल पवार यांनी गंभीरपणे घेतली. तसेच उमेश पाटलांना खडसावले देखील. त्यात आणखी एक भर म्हणजे राजन पाटील यांना महामंडळाचे अध्यक्षपद देऊन पक्षाने त्यांचा मोठा सन्मान केला. अर्थात उमेश पाटलांचा हा अपमानच होय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते पदाचा त्यांनी राजीनामा दिला. राजन पाटलांना "गिफ्ट" आणि इकडे उमेश पाटील "लेफ्ट" या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाच म्यानात दोन तलवारी राहूच शकत नाही हे सिद्ध झाले. राजीनामा नंतर उमेश पाटलांचा पुढचा मार्ग तुतारीच्या दिशेने झाला तर आश्चर्य वाटू नये.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow