अभाविप आणि मॉडर्न प्राथमिक व हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ३०१ फुटी तिरंगा पदयात्रेचे आयोजन..

अभाविप आणि मॉडर्न प्राथमिक व हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ३०१ फुटी तिरंगा पदयात्रेचे आयोजन..

Aug 14, 2024 - 06:38
 0  133
अभाविप आणि मॉडर्न प्राथमिक व हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ३०१ फुटी तिरंगा पदयात्रेचे आयोजन..

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्यवर्ती नगर आणि मॉडर्न प्राथमिक व हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरात ३०१ फूट तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सचिव के. के कुलकर्णी, मुख्याध्यापक शिल्पा जोशी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रज्ञा बोधे, अभाविप प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के, नगरमंत्री ब्रम्हा पाटील यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा पदयात्रेचे उद्घाटन करण्यात आले.
        "भारत माता की जय", "वंदे मातरम्", "काश्मिर हो या कन्याकुमारी भारत माता एक हमारी" या घोषणांनी पदयात्रा मार्ग दुमदुमून गेला होता. मॉडर्न हायस्कूल येथून पदयात्रेला प्रारंभ झाला - गांधी नगर - सात रस्ता - गोविंद मेडिकल - जगदंबा चौक मार्गे मॉडर्न हायस्कूल येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला. स्वतंत्र दिन हा उत्सव आहे या उत्सवाची समाजामध्ये वातावरण निर्मिती व्हावी यासाठी तिरंगा पदयात्रा काढण्यात आली होती अशी माहिती आयोजकांनी दिली. यावेळी नागरिक, प्राध्यापक,विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow