एवढी डेरिंग झालीय का?अजीतदादांचा महिला आयपीएस अधिकार्यास दम
मी डेप्युटी चीफ मिनिस्टर, तुझ्यावर डायरेक्ट अॅक्शन घेणार. अवैध उत्खनन करणार्या गुंडांना पाठिशी घालण्याचा प्रकार

(विजयकुमार पिसे)
माढा तालुक्यातील कुर्डू येथील प्रकार...अजितदादा महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णावर संतापले। दोघांमधील संभाषण काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका महिला आयपीएस अधिकार्याला फोनवर धमकी देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या स्वभावाप्रमाणे हे अपेक्षित असले तरी अजीतदादा अवैध मुरूम उत्खनन प्रक़रणात कार्यकर्त्यांना (गुंडांना) पाठिशी घालणे अपेक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होतो. संवैधानिक पदावरील (उपमुख्यमंत्री) व्यक्तीकडून असे कृत्य निंदनीय आहे, त्यामुळे फडणवीस सरकारमधील एक जबाबदार उपमुख्यमंत्रीवर कोणती कारवाई होणार? हा मुद्दाही उपस्थित झाला आहे.
महिला आयपीएस अधिकारी करमाळ्याचे पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना फोनवरुन झापल्याचा हा व्हिडीओ आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वीची असून माढा तालुक्याच्या कुर्डू गावात अवैध उत्खननच्या तक्रारीनंतर डीएसपी अंजली कृष्णा टीमसह घटनास्थळी धडकल्या. या दरम्यान अवैध मुरुम उत्खनन करणारे आणि अधिकारी यांच्यात वाद झाला. संबंधितांकडे लाठ्या काठ्या होत्या. त्यांनी यावेळी दमदाटीही केली.
यावेळी अजीतदादांचा कार्यकर्ता बाबा जगताप याने थेट उपमुख्यमंत्र्यांनाच फोन केला. आणि डीएसपी अंजली कृष्णा यांना तो दिला. यावेळी अजितदादांनी अंजली कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. पण अंजलीनी हीच बाब आपण आपल्या फोनवर कॉल करुन सांगा, असे सांगितले. त्यामुळे अजित पवार संतापले. एकेरीवर येत त्यांनी अंजलीवर कारवाई करण्याची धमकी दिली.
वास्तविक अजितदादांनी अवैध उत्खनन करणार्या गुंडांना झापण्यापेक्षा पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांनाच दम भरला. कारवाई आताच्या आता थांबवा. नाहीतर तुमच्यावर कारवाई करु, असे ते म्हणाले. यावेळी अंजली कृष्णा दादांचा उपमर्द न करता एवढेच म्हणाल्या, कार्यकर्त्याच्या फोन ऐवजी माझ्या वैयक्तिक नंबरवर फोन करुन सांगा, तुम्हीच आहात हे मी कसं समजणार? तेव्हा अजीतदादांना आणखी राग आला. त्यांनी नंबर घेऊन कृष्णा यांना व्हिडीओ कॉल केला. तहसीलदारांना सांगा माझा आदेश आहे, असे दादा म्हणाले.
*दादा आणि अंजली यांच्यात काय संवाद झाला...
*पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा : आम्हाला त्यांचं मदत करण्याचंच काम आहे सर
*अजित पवार : मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहे. तुम्ही जा आणि तहसीलदारांना सांगा की, स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला होता. त्यांनी मला ही सगळी कारवाई थांबवण्यास सांगितली आहे. कारण सध्या मुंबईत जरा वातावरण खराब झालं आहे. त्याला आपल्याला आधी प्राधान्य द्यायचं आहे. त्यांना माझं नाव सांगा. त्यांना सोडून द्या.
*डीएसपी अंजली कृष्णा : सर मला आपण हे माझ्या वैयक्तिक फोनवर फोन करुन सांगा.
*अजित पवार : एक मिनिट. मी तुझ्यावर डायरेक्ट अॅक्शन घेणार. तुम्ही मला डायरेक्ट कॉल करायला सांगत आहात?
*डीएसपी अंजली कृष्णा : सर आपण जे बोलत आहात ते समजत आहे. पण आपण मला कॉल करा.
*अजित पवार : तुला मला पाहायचं आहे ना, तुझा नंबर दे मी व्हाट्सअॅप कॉल करतो. मी इथून बोलतो. माझा चेहरा तर लक्षात येईल ना? तुमची एवढी डेरिंग झालीय का?
*डीएसपी अंजली कृष्णा : सर मला माहिती नाही ना सर.
*अजित पवार : मी डेप्युटी चीफ मिनिस्टर आहे.
*पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा : सर तुम्ही काय बोलताय ते मला समजतंय.
*अजित पवार : आपला नंबर द्या. मी डायरेक्ट कॉल करतो
डीएसपी अंजली कृष्णा : सर, 944.... (यावेळी अंजली आपल्या सहकार्यांना व्हिडीओ काढायला सांगतात).
What's Your Reaction?






