लेडी सिंघम अंजली कृष्णा कोण?

लेडी सिंघम अंजली कृष्णा कोण? करमाळ्याच्या डीएसपी अवैध उत्खनन करणार्‍या गुंडांना धडकल्या, आणि अजीतदादांनाही भिडल्या, म्हणाल्या माझ्या मोबाईलवर कॉल करा

Sep 5, 2025 - 00:35
 0  211
लेडी सिंघम अंजली कृष्णा कोण?

(विजयकुमार पिसे)
उपमुख्यमंत्री अजित पवाराना, थेट भिडलेल्या लेडी सिंघम अंजली कृष्णा यांच्यासमवेतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या अंजली केरळच्या असून सामान्य घरातून आलेल्या आहेत. 2022/23 च्या आयपीएस रँक़मधील आहेत.
   माढा तालुक्यात कुर्डू येथे अवैध मुरुम उत्खननविरोधात कारवाई करायला गेेल्यानंतर आयपीएस अंजली कृष्णा यांना अजित पवार यांनी फैलावर घेतले.  तेव्हा अंजली यांनी अजीतदादांना आपल्या फोनवर मला कॉल करा, असा सांगितल्यामुळे दादा संतापले. आपल्या फोनवर व्हिडीओ कॉल करायला भाग पाडणार्‍या महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांची सर्वत्र वाहव्वा होत आहे.
    अंजना कृष्णा वीएस हे अंजली यांचे नाव असून करमाळाच्या पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) अंजली डॅशिंग आयपीएस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1997 रोजी केरळच्या थिरुवनंतपुरम येथील मलयंकीजू या गावातील. बीजू छोटे  कापड  व्यावसायिक आहेत. आई सीना   कोर्टात टायपिस्ट आहेत. अंजली या एका सर्वसामान्य कुटुंबातून आल्या आहेत. त्यांनी स्वत: याबाबत एका कार्यक्रमात माहिती दिली होती. 
   अंजली यांनी यूपीएससी सीएसई 2022-23 मध्ये 355 रँक मिळवत यश संपादन केले. पूजप्पुरा येथील सेंट मेरीज सेंट्रल स्कूल येथून प्राथमिक, थिरुवनंतपुरमच्या नीरमंकरा येथे महाविद्यालयीन शिक्षण आणि बीएसस्सी गणितात पदवी घेतली आहे. यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी करून आयपीएस झाल्या आहेत.
आज या संभाषणानंतर अजीतदादांना भिडणार्‍या लेडी सिंघम अंजली कृष्णा यांच्याविषयी उत्सुकता वाढली होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow