भाजपा नगरसेविका राजश्री अनिल चव्हाण यांना राष्ट्रपती मुर्मू यांच्या भेटीचे निमंत्रण

भाजपा नगरसेविका राजश्री अनिल चव्हाण यांना राष्ट्रपती मुर्मू यांच्या भेटीचे निमंत्रण

Aug 14, 2025 - 21:58
 0  99
भाजपा नगरसेविका राजश्री अनिल चव्हाण यांना राष्ट्रपती मुर्मू यांच्या भेटीचे निमंत्रण

सोलापूर : भाजपा कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे सोलापुरातील भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगरसेविका सौ.राजश्री अनिल चव्हाण यांना भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपतीताई मुर्मू यांनी भेटीचे निमंत्रण दिले आहे.

दि 18 ऑगस्ट रोजी राजभवनात राष्ट्रपती यांचे कार्यालयाकडून भारतातून एकूण 56 जणांच्या भेटीची यादी प्रसिद्ध झाली असून महाराष्ट्रातून नगरसेविका सौ.राजश्री अनिल चव्हाण, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष ज्ञानेश्‍वर भोसले (मोहोळ), प्रदेश उपाध्यक्ष कोमल लक्ष्मण चव्हाण (हिंगोली) यांना निमंत्रित केले आहे. महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाजासाठी रोजगार, आर्थिक बळकटीकरण आर्थिक महामंडळाची स्थापना, शासनाच्या विविध योजना, तसेच समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रपती द्रौपतीताई मुर्मू यांचे समवेत बैठक होणार आहे. सदरची भेट घडवून आणणेकामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा अ.ज.मोर्चा प्रदेश अध्यक्ष उत्तमराव इंगळे, प्रदेश महामंत्री सुदर्शन शिंदे यांनी शिफारस केल्यामुळेच आदिवासी ही भेट निश्‍चित झाली आहे याबद्दल राजश्री चव्हाण यांचे अभिनंदन केले जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow