जुळे सोलापुरात नागरी सुविधांसाठी आरक्षण ठेवून आर्थिक तरतूद करा
सर्वपक्षीय मोर्चा काढून पालिका आयुक्तांकडे दावे हरकती दाखल.

सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढ भागात आणि जुळे सोलापूर परिसरातील नागरी सुविधांसाठी सुसज्ज दवाखाना आणि प्रसुतीगृह,नवे सुसज्ज बसस्थानक,नाट्यगृह,आणि पालिकेची इंग्रजी माध्यम शाळा,प्रलंबित उद्याने,अद्यावत भाजी मंडई या सर्व उपक्रमांसाठी सोईच्या जागेचे आरक्षण ठेवून आगामी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी,अशा विविध मागण्यांचे निवेदन आणि दावे हरकती सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांना सादर केले.
जुळे सोलापूर विकास आराखडा प्राधिकरण समिती आणि विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने नेहरू नगर पासून मोर्चा काढून घोषणा देत सर्वपक्षीय नेते,समाजसेवक,ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांनी सादर केले.
यावेळी आयुक्त शीतल तेली उगले यांनी एस. टी.स्थानक होण्यासाठी सहकार्य करुत अशी ग्वाही देत सकारात्मकता दाखविली.
माजी आमदार व शिवसेना नेते शिवशरण अण्णा पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डाॅ.बसवराज बगले,भाजपा नेते माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे,काँग्रेसचे नेते विजय शाबादी व परिवहनचे माजी सभापती सुभाष चव्हाण,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आणप्पा सतूबर, प्रा.विलास मोरे,सुभाष उळागडडे, बाळासाहेब पाटील,महेश पाटील, पांडुरंग पवार,विश्वनाथ आमणे, अशोक पाटील,महेश घाडगे,शैलेश आमणगी, वैशाली माशाळ,सुजाता म्हेत्रे,सुरेखा गोब्बूर, बाबूराव लददे,महेश देवकर,ताराचंद नाईक,सिद्राया माविनमर,संतोष कदम,पद्माकर कुलकर्णी, रेवणसिध्द कुसगल,प्रसाद गाजरे,शिवानंद नसली,गंगाधर पाटील,विवेक चव्हाण,पांडुरंग पवार,शिवशरण चितली,उमेश यळसंगी, वसंत पवार, सिद्राय्या होर्तीकर,आदि प्रमुख मंडळींनी या मोर्चाचे नेतृत्व केले.
What's Your Reaction?






