नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप, बक्षीस वितरण

प्रभाग क्रमांक 26 मधील हेरिटेज फाम येथे सालाबादप्रमाणे हेरिटेजचा राजा गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. आज अनंत चतुर्थी निमित्त महाप्रसाद वाटप व स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या त्याचे बक्षीस वितरण समारंभ प्रभाग क्रमांक 26 च्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

Sep 9, 2025 - 00:08
 0  4
नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप, बक्षीस वितरण

प्रभाग क्रमांक 26 मधील हेरिटेज फाम येथे सालाबादप्रमाणे हेरिटेजचा राजा गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. आज अनंत चतुर्थी निमित्त महाप्रसाद वाटप व स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या त्याचे बक्षीस वितरण समारंभ प्रभाग क्रमांक 26 च्या नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.   नगरसेविका  राजश्री चव्हाण व भाजपचे सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. व नंतर हेरिटेज भजनी मंडळ यांनी उत्कृष्ट भक्ती गीते सादर करण्यात आल्याने त्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
हेरिटेज फॉर्मचे चेअरमन श्री.सुजित कोरे सर यांनी सदर नगरातील पाण्याची पाईपलाईन,अंतर्गत दिवाबत्ती व रस्त्याच्या बाबतीत समस्या नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांना सांगितल्या असता नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांनी सांगितले की पाण्याच्या समस्या बाबत सोमवारी सोलापूर महानगरपालिका कडील हेड ऑफिस कडून सर्वे करून इस्टिमेट तयार करण्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी यांना कळविले असून तसेच अंतर्गत दिवाबत्ती बाबतीत झोन ५ कडील लाईट विभागाचे पवार यांना सर्वांचे समक्ष संपर्क साधला असता सदरचे काम प्रगतीपथावर असून सोमवारी किंवा मंगळवारी झोन अधिकारी हिबारे मॅडम यांना स्थळ पाहणी करून घेऊन हेड ऑफिसला पाठवून देतो असे समक्ष कळविण्यात आल्याने उपस्थितांमधून नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांचे आभार व्यक्त केले. 
तसेच ओम गर्जना चौक येथील मारुती मंदिर ते हेरिटेज फॉर्म पर्यंतचा रस्ता बाबतीत सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिलेले असून लवकरच सदर रस्त्याचे काम सुरू करणार आहोत असे कळविल्याने संबंधित नगरातील नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही सदर नगरात जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून राहात असून आम्ही शंभर टक्के सोलापूर महानगरपालिकेला टॅक्स भरतो परंतु आमचा म्हणावा तसा विकास झालेला नाही.
 पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर आम्ही सदर रस्त्याबाबत नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांना कळविल्याने तातडीने हेरिटेज फॉर्म समोरील रस्ता करून दिलेला असून उर्वरित समस्या साठी जातीने पाठपुरावा करून आमच्या उर्वरित समस्या दिवाळीच्या आत होतील असे ठोस आश्वासन दिले आहे. त्यामुळे आमच्या अनेक वर्षा पासूनच्या नागरिक समस्या दूर होणार आहे त्यात शंका नाही असे मनोगत व्यक्त केले. 
त्याप्रसंगी चेअरमन सुजित कोरे, महारुद्र खुरपे, ब्रह्मदेव थिटे,रवी कोटगी,विशाल खाडे,अमोल गोतसुर्वे,सागर माळी,राम सुरवसे, सोमनाथ स्वामी,विठ्ठल लहाने,वैभव ठोकळ,किरण क्षीरसागर,गजानन साठे,आशिष बिराजदार,विजय म्हमाणे,सूर्यकांत चौधरी,रवी मस्के तसेच शुक्ला साठे,सुचिता थिटे,अर्चना खुरपे,अंजली क्षीरसागर,मनीषा बिराजदार,ज्योती माळी,विजयश्री माशाळ, भाग्यश्री चौधरी,विद्या लहाने,रूपाली शिंदे, अश्विनी कोटगी,वायकर मॅडम,असे असंख्य महिला वर्ग,ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow