मोबाईल क्रांती, गोळीबारात 20 तरुण ठार, 256 जखमी; नेपाळमध्ये युवकांचा संसदेवर हल्लाबोल
मोबाईल क्रांती, गोळीबारात 20 तरुण ठार, 256 जखमी; नेपाळमध्ये युवकांचा संसदेवर हल्लाबोल

नेपाळच्या काठमांडूसह अनेक शहरात कर्प्यू लावण्यात आला असून सरकारच्या भ्रष्टाचाराची सोशल मिडियावर मोठी चर्चा आहे. देशात नॅरेटिव्ह पसरला, अफगाण,बांगला देशनंतर नेपाळमध्ये अस्थिरता, भारतासाठी धोकादायक
भारताच्या शेजारील राष्ट्र नेपाळमध्ये सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आल्यामुळे जेन झी (2000 सालानंतर जन्म झालेले विशीपर्यंतचे तरुण,युवक विद्यार्थी) कडून मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात येत असून आंदोलकांनी थेट संंसद परिसरात हल्लाबोल केला आहे. काही जण संसदेत घुसले आहेत. सोशल मीडियावर आणलेल्या बंदीमुळे युवकांनी जोरदार निदर्शने सुरू केली असून काठमांडू शहरात हजारो तरुण रस्त्यावर उतरला आहे. जेन झी रिव्होल्यूशनमध्ये 20 वर्षीय तरुण, कॉलेज विद्यार्थी आणि नवयुवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यामुळे हे आंदोलन सुरू असून आंदोलक संसदेत घुसले आहेत. त्यामुळे लष्कराला पाचारण केले आहे. गोळीबारात 20 तरुण ठार तर 256 जण गंभीर जखमी झाले, अशी ध़क्कादायक माहिती आहे.
सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून सोेशल मिडियातून याची खूप चर्चा सुरू आहे. सरकारविरोधात नॅरेटिव्ह पसरवण्याचे काम सोशल मिडियाने केले आहे. त्यामुळे नेपाळमध्ये फेसबुक, ट्विटर यांसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीविरोधात आज सोमवारी मोठ्या संख्येने युवक रस्त्यावर उतरले. त्यांची निदर्शने हाताबाहेर गेले. बॅरिकेड्सही तोडले. पोलिसांवर हल्ला केला. संसद भवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या हातघाईत लष्काराला पाचारण करावे लागले. त्यांनी गोळीबार केला. तेथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून काठमांडूसह अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे.
नेपाळच्या ओली सरकारने 4 सप्टेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली असून फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सप आणि यूट्यूब यांसारख्या 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी आहे. म्हणजे सेन्सॉरशिप आणि लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असा आरोप आहे. यामुळे तरुण रस्त्यावर उतरून हिंसक झाले आहेत.
जगभरामध्ये गेल्या दोन शतकात अनेक क्रांती झाल्या. यामध्ये रक्तरंजीतच अधिक. 21 व्या शतकात आणि या दशकात सोशल मिडियाची क्रांती झाली. नेपाळमध्ये या मोबाईल क्रांतीमुळे 20 तरुणांना आपले जीव गमवावे लागले, तर 250 पेक्षा अधिक़जण गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत. भारतात ही मोबाईल क्रांती मै हूँ अण्णा (अण्णा हजारे) नावाने पहिल्यांदा झाली. नंतर 2014 मध्ये याच तरुणांनी देशात परिवर्तन घडवले.
चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळमध्ये गेल्या 30 वर्षात अस्थिरता आहे. शेजारच्या बांगला देशातही अराजकता असून गत वर्षी हिंसाचार झाला. नेपाळचे राजे सरकार घालवल्यानंतर कम्युनिस्ट विचाराने पछाडलेले नेपाळच्या राज्यकर्ते कधीच स्थिर सरकार देउ शकले नाहीत. भारतामध्ये 1960 च्या दशकात शांती आणि मैत्री पर्वाचा ध्यास घेत पंडित नेहरू यांनी हिंदी/चीनी भाई भाई असा नारा दिला. परिणामी 1962 मध्ये गाफील भारतावर चीनने हल्ला केला. भारताची हजारो एकर जमीन चीनने घशात घातली.
What's Your Reaction?






