या भाजपा नेत्याची काँग्रेसने केली हकालपट्टी
दिग्गीराजांचे बंधू लक्ष्मणसिंग मुळचे काँग्रेसी, त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. पुन्हा नंतर त्यांची घरवापसी झाली.

(विजयकुमार पिसे)
दिग्गीराजांचे बंधू लक्ष्मणसिंग मुळचे काँग्रेसी, त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. पुन्हा नंतर त्यांची घरवापसी झाली.
*आता या पूर्वाश्रमीच्या भाजपा नेत्याची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली आहे. तब्बल पाच वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार राहिलेले लक्ष्मणसिंह कडवट काँग्रेसी नेते. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्वीजयसिंग यांचे ते बंधू. लक्ष्मणसिंग यांचे न्यूसन्स अधिक.
लक्ष्मणसिंह काँग्रेसमधून भाजपात आल्यानंतरही खोड गेली नाही. भाजपात त्यांनी 2004 ते 2009 पर्यंत होते. यानंतर त्यांची घरवापसी झाली. येथे आल्यानंतर लक्ष्मणसिंग सातत्याने राहुल गांधींवर टीकेची झोड उठवायचे. ते राहुल गांधींना अगदी शिवराळ भाषेत उध्दार करायचे. अब लंगडा घोडा, बारात का घोडा, खुद की बारात अभी निकली नही, वे बारात के घोडे और रेस के घोडे की बात करते है। लक्ष्मणसिंह यांना ताकीद देऊनही फरक पडला नाही. अखेर पक्षाच्या शिस्तपालन समितीने त्यांना कारवाईची नोटीस बजावली. या नोटिशीला त्यांनी डस्टबिन दाखवले. शिवाय म्हणाले, राहुल गांधी प्रधानमंत्री होणार, असे मी लिहून दिले पाहिजे,अशी मला अट होती. पण मी नकार दिला. त्यामुळे काँग्रेसने लक्ष्मणसिंग यांना पक्षातून हकालपट्टी केली आहे. विशेष म्हणजे दिग्गीराजा राहुल गांधी यांचे अतिविश्वासू नेते. पण बंधू लक्ष्मणसिंग यांच्या कारवाईबाबत काँग्रेसने कसलीही दयामाया दाखवली नाही. दिग्गीराजा यांचीही हकालपट्टीबाबत प्रतिक्रिया आलेली नाही, हे विशेष.
What's Your Reaction?






