तेजस्वी यादवची मैत्रीण जायंट किलर, भाजपाच्या तिकीटावर विजय
राजदच्या बाहुबली उमेदवाराला या खेळाडूने चारले खडे, राष्ट्रकुल स्पर्धेच्या मैदानात आणि निवडणूक रिंगणातही सरशी
(विजयकुमार पिसे)
बिहारचा निकाल धक्कादायकच ठरला. महागठबंधनला आणखी एक धक्का म्हणजे राजदच्या तेजस्वी यादवची मैत्रीण चक्क भाजपाच्या तिकीटावर जिंकून तेजस्वीचे नाक कापले.
तेजस्वीची मैत्रीण राष्ट्रीय खेळाडू असून तिने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. गतवेळी देखील ती रिंगणात होती.
जमुई मतदारसंघातून तिने दुसर्यांदा विजय संपादन केला असून ती मोदींची विश्वासू असल्याचे मानले जाते. गत निवडणुकीत तिला भाजपाने संधी दिली होती. राजकारणाचा अनुभव नसला तरी ती जमुईमध्ये लोकप्रिय आहे. श्रेयसी सिंह असे तेजस्वीच्या मैत्रीणीचे नाव असून तिच्यासमोर राष्ट्रीय जनता दलाच्या मोहम्मद आलम आणि जनसुराजच्या अनिल साह यांचे कडवे आव्हान होते. त्यामुळे भाजपाच्या श्रेयसीला जिंकण्याचे श्रेय मिळणार की नाही, याविषयी शंका होती.
पण श्रेयसी जायंट किलर ठरली. तिने तब्बल 1 लाख 23 हजार मतं घेतली, तर मोहम्मद आलमला 69 हजार 370 मतं. 54 हजार श्रेयशी सिंहने विजय संपादन केला. अशा दणकेबाज खेळाडूच्या यशाने भाजपाच्या विजयात चार चाँद लागले असून नव्या सरकारात श्रेयशी सिंह मंत्री होईल अशी चर्चा आहे.
What's Your Reaction?